मुंबई : इंदौरमध्ये राहुलने धमाकेदार खेळी करत पाकिस्तानातील काही क्रिकेट प्रेमींचं देखील मन जिंकलं. आयपीएलमध्ये पंजाबकडून ओपनिंग करणारा लोकेश राहुल सध्या चांगल्याचं फॉरर्मात आहे. इंदौरमध्ये देखील त्याने चांगली खेळी केली. इंदौरमध्ये राहुलच्या शानदार खेळीवर पाकिस्तानमधील सुंदर अँकर जैनब अब्बास देखील फिदा झाली. राहुलच्या या शानदार खेळीच्या जोरावर पंजाबने विजय मिळवला. क्रिकेटवर प्रेम करणारी जैनब अब्बासने राहुलच्या या खेळीवर सुंदर प्रतिक्रिया दिली. तिने ट्विट करत म्हटलं की, "लोकेश राहुल प्रभावी, शानदार टायमिंग, पाहण्यात मजा आली.'
KL Rahul impressive,superb timing,great to watch.. #RRvKXIP
— zainab abbas (@ZAbbasOfficial) May 6, 2018
जैनब अब्बास पाकिस्तानी मीडियामधील स्पोर्ट्स अँकर आहे. PSL म्हणजेच पाकिस्तानी सुपर लीगमध्ये ती प्रजेंटर देखील होती. भारत-पाकिस्तानमधील नाजूक संबंधांमुळे आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे. तरी देखील जैनबने राहुलच्या या खेळीचं कौतूक केलं.
पंजाबच्या ओपनर लोकेश राहुलने राजस्थान विरुद्ध 155.55 च्या स्ट्राइक रेटने 54 बॉलमध्ये नाबाद 84 रन केले. राहुलच्या या खेळीमध्ये त्याने 7 फोर आणि 3 सिक्स ठोकले. राहुलने म्हटलं की, 'माझ्यासाठी हा माझा पहिला नॉक आहे. खेळून मला खूप छान वाटलं. कारण यामुळे टीम विजयी झाली.'
राहुलच्या शानदार खेळीमुळे पंजाबने राजस्थान विरुद्ध सामना 8 बॉल बाकी ठेवत 6 विकेटने जिंकला. आयपीएलमध्ये पंजाबचा 9 सामन्यांमध्ये हा सहावा विजय आहे. पंजाब 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.