Pak Vs Nz Semi-Final : पाकिस्तानला फायनलचं तिकीट, न्यूझीलंडचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney cricket ground) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा (PakVsNz) पराभव केला आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानने (Pakistan) तुफान फलंदाजी करत न्यूझीलंडच्या (New Zealand) गोलंदाजांचा धुव्वा उडवला. 

Updated: Nov 9, 2022, 05:37 PM IST
Pak Vs Nz Semi-Final : पाकिस्तानला फायनलचं तिकीट, न्यूझीलंडचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं title=

T20 World Cup Semi-Final: सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney cricket ground) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा (PakVsNz) पराभव केला आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानने (Pakistan) तुफान फलंदाजी करत न्यूझीलंडच्या (New Zealand) गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या विजयामुळे पाकिस्तानने थेट फायनलमध्ये (T20 World Cup Final) धडक मारली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला 153 रन्सचं आव्हान दिलं होतं. अखेरच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानने हे आव्हान पूर्ण करत 7 विकेट्सने विजय मिळवला. 

प्रथम टॉस जिंकत न्यूझीलंडने फलंदाजी केली. यावेळी न्यूझीलंडच्या फलंजाना चांगला खेळ करता आला नाही. 4 विकेट्स गमावत त्यांनी 152 रन्सचं आव्हान दिलं. मात्र सहजरित्या पाकिस्तानने हे आव्हान पूर्ण केलं. या विजयामुळे टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्तानने तिसऱ्यांदा फायनलपर्यंत मजल मारली आहे.

रिझवान-बाबर जोडीने खेचून आणला विजय

पाकिस्तानने फलंदाजीला चांगली सुरुवात केली. ओपनर बाबर आणि रिझवान यांना उत्तम खेळी करत अर्धशतकं ठोकली. 53 रन्सवर बाबर माघारी परतल्यावरही रिझवावने त्याचा खेळ सुरु ठेवला. मोहम्मद हॅरिसनेही त्याला 30 रन्सची साथ देत विजय खेचून आणला. अखेर 3 विकेट्स गमावत पाकिस्तानने 19.1 ओव्हरमध्ये 153 रन्सचं लक्ष्य पूर्ण करत न्यूझीलंडचा पराभव केला. 

सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मोठ्या मुश्किलीने टीमला 100 रन्सचा स्कोर गाठता आला. एका बाजूने विकेट्स जात असताना कर्णधार केन विलियम्सन मात्र किल्ला लढवत होता. केनने 42 बॉल्समध्ये 46 रन्सची खेळी केली. न्यूझीलंडकडून डेरल मिशेल याने सर्वाधिक रन्स करत अर्धशतक झळकावलं. 35 बॉल्समध्ये त्याने 53 रन्सची शानदार खेळी केली.  

उद्याची सेमीफायनल भारत विरुद्ध इंग्लंड

पाकिस्तान टीमने आता फायनलमध्ये धडक मारलीये. तर उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनल सामना रंगणार आहे. या सामन्यात जी टीम जिंकेल ती पाकिस्तानविरुद्ध 13 नोव्हेंबरला फायनल सामना खेळेल. फायनलचा सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळणार आहे.