New Zealand beat England by 9 wickets : वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा लाजीरवाणा पराभव केला आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडने विजयाचं खातं उघडलंय. इंग्लंडने दिलेल्या 283 धावांचं आव्हान पार करताना न्यूझीलंडच्या डेवॉन कॉन्वे (Devon Conway) आणि रचिन रविंद्र (Rachin Ravindra) यांनी शतक ठोकलं अन् न्यूझीलंडला पहिला विजय मिळवून दिलाय. त्याचबरोबर न्यूझीलंडने 2019 च्या वर्ल्ड कप फायनलचा बदला घेतला आहे. (New Zealand take revenge beat England by 9 wickets in 1st cricket world cup 2023)
इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी 283 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला उत्तर देताना सलामीवीर विल यंग एकही धाव न करता बाद झाला. त्यानंतर मात्र, डेवॉन कॉन्वे आणि रचिन रविंद्र यांनी कमान हातात घेतली. दोघांनी सुरूवातीला हळूवार सुरूवात केली अन् 25 व्या ओव्हरनंतर घेर बदलले. डेवॉन कॉन्वे (Devon Conway) हा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. तर त्यापाठोपाठ रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने देखील शतक ठोकलं. त्यामुळे न्यूझीलंडने 37 व्या ओव्हरमध्येच सामना संपवला.
इंग्लंडकडून जो रूट (joe root) याने सर्वाधिक 77 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. तर कॅप्टन जॉस बटलरने (Jos Buttler) 43 धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला 50 ओव्हरमध्ये 282 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने अचूक गोलंदाजी केली अन् 3 विकेट्स घेतल्या. तर मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्सने 2-2 विकेट नावावर केल्या.
Devon Conway (152*) and Rachin Ravindra (123*) guide the team to an opening win in India! Both on @cricketworldcup debut. Scorecard | https://t.co/aNkBrDiAuv #CWC23 pic.twitter.com/pWrLvtCqPP
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 5, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट.