AB De Villiers On Sanju Samson: गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयचे (BCCI) निर्णय पाहता लिमिटेड क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी कर्णधार मिळणार असल्याची शक्यता आहे. अशातच आता टी-ट्वेंटी क्रिकेटचा माजी महान खेळाडू एबी डिव्हिलियर्स (AB De Villiers) याने अशा एका खेळाडूचं नाव घेतलं आहे की, अनेकांचे डोळे उघडेच्या उडघे राहिल्याचं पहायला मिळतंय. एबीडीने अशा एका खेळाडूचं नाव घेतलंय. ज्याला टीम इंडियात संधी देण्यात येत नाहीये. होय, त्याचं नाव संजू सॅमसन (Sanju Samson).
राजस्थान रॉयल्सचं (RR) नेतृत्व करत असलेला संजू सॅमसन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात कर्णधारपदाची चुणूक दाखवत राजस्थानने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. राजस्थानने हा सामना 72 धावांनी जिंकला होता. या सामन्यात कॅप्टन संजू सॅमसनने 32 चेंडूत 55 धावांची स्फोटक खेळी केली होती. त्यामुळे नेटकऱ्यांनी ताशेरे ओढले होते. अशातच आता एबी डिव्हिलियर्स (AB De Villiers On Sanju Samson) देखील संजूच्या बाजूने उभा राहिल्याचं दिसतंय.
IPL 2023 : मराठमोळ्या खेळाडूमुळं हार्दिक पांड्याचं करिअर धोक्यात?
संजू सॅमसन (Sanju Samson) हा एक अप्रतिम खेळाडू आहे आणि त्याच्याकडे एक अप्रतिम कर्णधार होण्याचे सर्व गुण आहेत. कुणास ठाऊक, भारतीय संघातील एका फॉरमॅटमध्ये तो सहज कर्णधार होऊ शकतो, असं म्हणत एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) संजू सॅमसन यांचं कौतूक केलंय.
AB De Villiers said, "Sanju Samson is an incredible player and got all the credentials to be a wonderful captain. Who knows, in one of the formats in the India team, he could very easily be the captain there".
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2023
दरम्यान, मागील हंगामात संजूच्या नेतृत्वाखाली राजस्थानने फायनल (IPL 2022 Final) गाठली होती. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. एबीच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. संजू हा उत्तम खेळाडू असण्याबरोबरच एक उत्तम कर्णधार देखील आहे. त्यामुळे आता त्याला टीम इंडियाचं (Team India) संधी मिळणार का? एवढंच नाही तर त्याला टीम इंडियाची जबाबदारी देणार की नाही? असा सवाल विचारला जातोय.