नवा गडी नवं राज्य, हा नवा कॅप्टन गौतम गंभीरनंतर कोलकाताला आयपीएल ट्रॉफी जिंकून देणार?

युवा आहे पण छावा आहे, केकेआरची कॅप्टन्सी या स्टार खेळाडूकडे, गौतम गंभीरनंतर कोलकाताला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी सज्ज  

Updated: Mar 9, 2022, 03:36 PM IST
नवा गडी नवं राज्य, हा नवा कॅप्टन गौतम गंभीरनंतर कोलकाताला आयपीएल ट्रॉफी जिंकून देणार?   title=

मुंबई : आयपीएलचा नव्या 15 वा हंगामा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 10 संघांमध्ये 70 सामने होणार आहेत. पुणे आणि मुंबईमध्ये सर्व सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा पहिला सामना गतविजेत्या चेन्नई संघ विरुद्ध कोलकाता यांच्यात होणार आहे. चेन्नईला पहिल्याच सामन्यात शह देण्यासाठी मास्टरप्लॅन सुरू आहे. 

कोलकाता संघाने आपला नवा कर्णधार निवडला आहे. नवा कर्णधा नवा संघ आणि नवा जोश या तिन्ही गोष्टींसह पुन्हा एकदा कोलकाता टीम मैदानात उतरणार आहे. नव्या कर्णधारासह संभाव्य प्लेइंग इलेव्हन कसं असणार जाणून घ्या.

कोलकाता संभाव्य प्लेइंग इलेव्हन
एलेक्स हेल्स, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नीतीश राणा, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, उमेश यादव. 

पहिल्या तीन सीझनमध्ये कोलकाता संघ सलग आठव्या, सहाव्या स्थानावर होती. मात्र गेल्या वर्षी फायनलपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आलं. तिथे चेन्नईला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. इयोन मॉर्गन त्यावेळी संघाचं नेतृत्व करत होता. यावेळी मॉर्गनला कर्णधारपद देण्यात आलं नाही. 

मेगा ऑक्शनमध्ये कोलकाता संघाने शिवम मावी आणि पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर यांच्यावर मोठी बोली लागली. कमिन्सला 7.25 कोटीमध्ये संघात घेतलं. श्रेयस अय्यरने 12.25 कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं. तर नितीश राणावर 8 कोटी खर्च केले आहेत. शिवम मावीला 7.25 कोटी रुपयांमध्ये घेतलं आहे. 

कोलकाता संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, नीतीश राणा, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिंस, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सॅम बिलिंग्स, अनुकुल रॉय, अशोक शर्मा, टिम साउदी, एलेक्स हेल्स, मोहम्मद नबी, उमेश यादव, बी इंद्रजीत, चमिका करुणारत्ने, रसिख सलाम, अभिजीत तोमर, प्रथम सिंह, अमन खान आणि रमेश कुमार.