IPL2021 MI vs DC : फील्डिंग करताना हिटमॅन रोहित शर्माला दुखापत

रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे त्याने मैदान सोडलं, तर कर्णधारपदाची जबाबदारी पोलार्डने सांभाळले.

Updated: Apr 21, 2021, 08:35 AM IST
IPL2021 MI vs DC : फील्डिंग करताना हिटमॅन रोहित शर्माला दुखापत title=

मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स नुकत्याच झालेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माला दुखापत झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजी दरम्यान रोहित शर्मा फील्डिंगवर रोहित शर्मा जखमी झाला आहे. 

दिल्ली कॅपिटल फलंदाजी दरम्यान रोहित शर्मा 13 व्या ओव्हरदरम्यान मैदानाबाहेर गेला. त्यानंतर अनुभवी किरोन पोलार्डने मैदानावर कर्णधाराची भूमिका बजावली आणि संघासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंगही केली.

रोहितला दुखापतीबद्दल विचारले असता तो म्हणाला की, 'माझ्या बोटाला थोडीशी दुखापत झाली आहे, लवकरच बरे होईल.' दुखापतीमुळे रोहित दुखापत झाल्याने मैदानात नंतर उतरला नाही. रोहितला दुखापत झाल्यानंतर अनेक चाहते लवकर बरं व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत. 

टॉस जिंकून मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा बॅटिंग निवडली. रोहितने 30 बॉलमध्ये 44 रन तर इशान किशननं 28 बॉलमध्ये 26 रन केले. सुर्यकुमार यादवने 15 बॉलमध्ये 24 रन केले. 137 रन करून 9 गडी गमवाल्यानंतर दिल्लीसमोर मुंबईनं 138 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. 

चेपॉकवर झालेल्या मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली संघाने 6 विकेट्सनं विजय मिळवला आहे. मुंबईचा संघ अमित मिश्रासमोर 9 गडी राखून 137 धावा करू शकला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 44 धावा केल्या.