IPL 2023 Points Table : टी-ट्वेंटीचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रमियम लीगला (IPL 2023) धुम धडाक्यात सुरूवात झाली आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील सामन्यांचा आनंद लुटत असल्याचं पहायला मिळतंय. तर मैदानात देखील प्रेक्षकांची मोठी क्रेझ दिसून येत आहे. अशातच आयपीएलला सुरूवात तर झालीये. पण आयपीएलमध्ये कोणते संघ कोणत्या स्थानावर (IPL 2023 Points Table) आहेत? माहितीये का? जाणून घ्या...
सर्व संघाच्या पहिल्या सामन्यानंतर आता आयपीएलच्या अंकतालिकेत (IPL 2023 Points Table) सर्वात अव्वल स्थानावर राजस्थान रॉयल्सचा (RR) संघ आहे. राजस्थानने हैदराबादचा (SRH) पराभव करत 3.600 अंकाची लीड घेतली. तर दिल्ली कॅपिटल्सचा (DC) पराभव करत लखनऊने (LSG) दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर तिसऱ्या स्थानी कोहलीच्या विराट खेळीमुळे आयसीबीने (RCB) जागा मिळवली आहे. बंगळुरूने मुंबईचा (MI) पराभव करत 1.981 गुण घेतले आहेत.
पहिल्याच सामन्यात धोनीच्या चेन्नईचा (CSK) पराभव करत गुजरात टायटन्सने (GT) विजयाची परंपरा सुरू ठेवली आहे. डिफेन्डिंग चॅम्पियन गुजरात 0.514 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर केकेआरचा (KKR) पराभव करत पंजाबने (PBKS) पाचव्या स्थानी मुसंडी मारली. पंजाबकडे 0.438 पॉईन्ट्स आहेत.
दरम्यान, आयपीएलचे 5 सामना झाले असून चेन्नईच्या मैदानावर 3 एप्रिलला रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जाएन्ट (CSK vs LSG) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात पराभव पाहिल्यानंतर आता अंकतालिकेत चेन्नई खालं खोलणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. तर दुसरा सामना जिंकून अंकतालिकेत अव्वल स्थान प्राप्त करण्याचं लक्ष लखनऊचं असणार आहे.