Ishant Sharma on Axar Patel: टीम इंडियाचा 34 वर्षांचा तरुण बॉलर तब्बल 700 दिवसांनंतर मैदानात उतरला आणि विरोधकांच्या दांड्या गुल केल्या. तीन विकेट घेत इशांतने (Ishant Sharma) दिल्लीचा गाडी पुन्हा रुळावर आणली. ईशांतच्या या अफलातून कामगिरीमुळे दिल्लीने (Delhi Capitals) बॅक टू बॅक विजय साजरा केला. दिल्लीच्या संघात परतण्यापूर्वी वेगवान गोलंदाज इशांत शर्माची प्रकृती खालावली होती. ताप आल्याने त्याला चालताही येत नव्हतं. त्यावेळी सर्वांनी ईशांतची काळजी घेतली. त्यावेळचा एक मजेशीर किस्सा अक्षर पटेलने (Axar Patel) शेअर केला आहे.
दिल्ली कॅपिटल्स त्यांचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC VS RCB) यांच्या खेळला जाणार होता. आयसीबीविरुद्ध बंगळुरू येथे सामना अटीतटीचा झाला. त्यावेळी ईशांत शर्मा तापाने फणफणत होता. त्यानंतर आता इशांत बरा झाल्यावर अक्षरने त्यादिवशी सर्वांसमोर काय झालं? याची हकीकत सांगितली. त्याचा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सने (DC Share Video) त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
जेव्हा ईशानने थोडा वेळ उभं राहण्याची ताकद मिळाली, तेव्हा तो जेवणाचा ट्रे उचलला आणि अक्षरच्या खोलीत आला. तुला लाज वाटत नाही, तू मला एकदाही फोन नाही केला, मी जगतोय की मरतोय, याची तुला काही पडली नाही. तू मला एकदाही विचारलं नाहीस, असं म्हणत इशांतने अक्षरला झाप झाप झापलं. इशांतचा राग पाहून बापूने (अक्षरने) त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा - Rohit Sharma चं 'हिटमॅन' नाव कसं पडलं? बर्थडे निमित्त जाणून घ्या रंजक किस्सा!
मी तुझ्यासाठी प्रार्थना करत होतो. माझ्या प्रार्थनेने तू सामन्यात पुनरागमन केलंस आणि 3 विकेट्स घेतले अन् चमत्कारच केला. तुला एक लाखाचे बक्षीस मिळालं आहे ते मी केलेल्या प्रार्थनेमुळंच, असं म्हणत अक्षरने इशांत शर्माला शांत केलं. या दोघांच्या मुलाखतीचा व्हिडिओ (Ishant Sharma Interview With Axar Patel) दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला आहे. त्यावेळी दोघांनी धमाल आणि मस्ती केली.
Our favorite host Bapu is back with an all new episode of #DhaiAxarGameKe
Head over to our YouTube and Facebook to watch the full conversation with none other than Ishu Bhai in our first episode of #IPL2023
#YehHaiNayiDilli @akshar2026 @ImIshant pic.twitter.com/51ske8rPU2
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2023
दरम्यान, इतकी वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर ज्या गोष्टींसाठी मी वेळ देऊ शकलो नाही अशा गोष्टींवर मी काम केलं, असं म्हणत इशांतने कमबॅकच्या संघर्षाची कहाणी सांगितली. माझी गोलंदाजी सुधारण्यासाठी आणि लय परत मिळवण्यासाठी मला काही गोष्टींवर काम करावं लागलं, असंही इशांत (Ishant Sharma) यावेळी म्हणाला आहे.