रोहित शर्माला हा स्टार खेळाडू टी 20 वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो : शास्त्री

येत्या काळात हा युवा खेळाडू टीम इंडियासाठी शानदार कामगिरी करेल, असा विश्वास रवी शास्त्रींना आहे.   

Updated: Apr 8, 2022, 08:46 PM IST
रोहित शर्माला हा स्टार खेळाडू टी 20 वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो : शास्त्री title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) अनेक युवा खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. आतापर्यंत झालेल्या अनेक सामन्यात थरार पाहायला मिळाला. विशेष करुन युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने छाप सोडली.  या दरम्यान टीम इंडियाचे (Team India) माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना आयपीएलमधील एक खेळाडूची कामगिरी चांगलीच पसंतीस पडली आहे. येत्या काळात हा युवा खेळाडू टीम इंडियासाठी शानदार कामगिरी करेल, असा विश्वास रवी शास्त्रींना आहे. (ipl 2022 team india former coach ravi shastri on lsg lucknow super giants shubaman gill)

शास्त्री यांनी आक्रमक बॅट्समन शुभमन गिल हा क्रिकेट विश्वातला उदयोन्मुख खेळाडू असल्याचं म्हटलं. गिल त्याच्या फटकेबाजीमुळे टी-20 फॉरमॅटसाठी परफेक्ट खेळाडू आहे. शुबमन आयपीएलच्या 15 व्या मोसमात गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. 

शुबमनचा आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने चांगली कामगिरी करण्याचा मानस असणार आहे. शुबमन टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावेल, असाही विश्वास शास्त्री यांना आहे.

शास्त्री काय म्हणाले? 

शास्त्री यांनी आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या सुरुवातीच्या कामगिरीबाबत वक्तव्य केलं. "गिल प्रतिभावन क्रिकेटपटूपैकी एक आहे. शुबमन असाच खेळत राहिला, तर तो मोठी धावसंख्या उभारु शकतो. तो मैदानात सेट झाल्यावर सहजपणे बॅटिंग करतो. शुबमनचं शॉट सेलेक्शन आणि स्ट्राइर रोटेट करण्याच्या प्रतिभेमुळे त्याच्यावरील दबाव कमी होण्यास मदत होते", असं शास्त्री यांनी नमूद केलं. ते  स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह या कार्यक्रमात बोलत होते.