अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022 Final) अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले आहे. (ipl 2022 final gt vs rr rajsthan royals set 131 runs target for win gujrat titans)
गुजरातच्या गोलंदाजांसमोर जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला विशेष काही करता आलं नाही. या दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली. मात्र मोठी खेळी करण्यात या दोघांना अपयश आलं.
बटलरने राजस्थानकडून सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. तर यशस्वीने 22 रन्सचं योगदान दिलं. तर गुजरातकडून कॅप्टन हार्दिक पंड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. साई किशोरने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
राजस्थान रॉयल्सची शिलेदार : संजू सॅमसन (कर्णधार-विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जायसवाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय.
गुजरातची प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल आणि मोहम्मद शमी.