विराट कोहलीकडे आहेत जगातील 'या' सगळ्यात महागड्या वस्तू, किंमत ऐकून बसेल धक्का

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली उत्तम लक्झरी लाइफ जगतो.

Updated: Oct 7, 2021, 03:40 PM IST
विराट कोहलीकडे आहेत जगातील 'या' सगळ्यात महागड्या वस्तू, किंमत ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली उत्तम लक्झरी लाइफ जगतो. विराट कोहलीकडे जगात एकापेक्षा एक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. विराट कोहली जगातील सर्वात महागड्या आणि सगळ्यात जास्त पैसे असल्याचा खेळाडूंपैकी एक आहे. फोर्ब्सच्या यादीत विराट कोहली सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे, ज्याचे वार्षिक उत्पन्न 196 कोटी आहे. आज आम्ही तुम्हाला विराटकडे अकलेल्या मौल्यवान आणि आलिशान गोष्टीबद्द्ल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

विराट कोहलीला घड्याळांची आवड

विराट कोहलीला घड्याळांची खूप आवड आहे. विराट कोहली घातल असलेल्या घड्याळाची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. विराट कोहलीकडे असलेल्या घड्याळाची किंमत सुमारे 70 लाख रुपये आहे. कोहलीकडे कपडे, शूज आणि घड्याळांचे ब्रँडेड कलेक्शन आहे.

विराट कोहलीच्या घड्याळात नीलमणी, सोने आणि हिरा वापरण्यात आला आहे, ज्यामुळे घड्याळ दिसताना आकर्षक दिसतो, तसेच याचे फिचर्स विराट कोहलीला स्टायलिश आणि महागडी घड्याळे घालण्याची खूप आवड आहे, म्हणूनच त्याच्याकडे वेगवेगळ्या ब्रँडच्या घड्याळांचा संपूर्ण संग्रह आहे.

फ्लाइंग स्पर कार मालक

फायनान्शिअल एक्स्प्रेसनुसार, विराट कोहली बेंटले फ्लाइंग स्पर कारचा मालक आहे. या सेडान कारची किंमत सुमारे 3.97 कोटी आहे.

मुंबईत 34 कोटींचे घर

विराट कोहलीचा वरळी, मुंबई येथे आलिशान फ्लॅट आहे. हा फ्लॅट विराट-अनुष्का यांनी त्यांच्या लग्नापूर्वी 2016 मध्ये खरेदी केला होता. 7, 171 चौरस फुटांची हा अपार्टमेंट ओंकार 1973 च्या 35 व्या मजल्यावर आहे. या अपार्टमेंटमधून संपूर्ण मुंबई शहर आणि अरबी समुद्र स्पष्ट दिसते. त्याची किंमत सुमारे 34 कोटी आहे.

कोहलीचा 80 कोटींचा बंगला

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा हरयाणातील गुरुग्राममध्ये एक आलिशान बंगला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या बंगल्याची किंमत 80 कोटी रुपये आहे. या बंगल्यात एक पूल, जिम आणि आलिशान सामान आहे.

बेंटले कॉन्टिनेंटल

विराट कोहलीचे कारप्रेम कोणापासून लपलेले नाही. त्याच्याकडे उत्तम गाड्यांचा संग्रह आहे. ज्यात द बेंटले कॉन्टिनेंटल त्याच्या आवडत्या कारपैकी एक आहे. त्याने 2018 मध्ये स्वतःसाठी ही आलिशान कार खरेदी केली. मुलीच्या जन्मापूर्वी कोहली पत्नी अनुष्कासोबत त्याच कारमध्ये दिसला. या कारची किंमत 4 ते 4.6 कोटी दरम्यान आहे.

85 हजार महाग पाकीट

विराट कोहलीच्या सर्वात मौल्यवान गोष्टींमध्ये त्याच्या वॉलेटचा समावेश आहे. त्याच्याकडे Loes Moytonji ब्रँडची पर्स आहे, ज्याची किंमत 85 हजार रुपये आहे.

खाजगी विमान

विराट कोहलीकडे एक खासगी जेटही आहे, ज्याची किंमत 125 कोटी रुपये आहे. कोहली आपल्या पत्नीला फिरवण्यासाठी या जेटचा वापर करतो. विराट आणि अनुष्का अतिशय आलिशान जीवन जगतात. त्याची वार्षिक कमाई $ 26 दशलक्ष (196 कोटी रुपये) आहे.