मुंबई : सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने सामन्या दरम्यान पंजाबच्या फलंदाजांवर कहर केला. चाहरने त्याच्या 4 ओव्हरमध्ये केवळ 13 धावा देऊन 4 बळी घेतले. चहरने मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरण आणि दीपक हूडा यांसारख्या बड्या खेळाडूंची विकेट घेतली. आयपीएलमधील चहारची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. एवढेच नव्हे तर चहरने आपली शेवटची ओव्हर मेडन टाकली.
या सामन्यानंतर चाहरने (Deepak Chahar) मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की सोशल मीडियावर कोणीतरी त्याला सामना न खेळण्याचा सल्ला दिला होता. सामन्यानंतर शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) दिलेल्या मुलाखतीत चाहर म्हणाला, “शेवटच्या सामन्यात माझी गोलंदाजी चांगली नव्हती आणि मी 3-4 ओव्हरमध्ये सुमारे 35 धावा दिल्या होत्या. सामन्यानंतर मी खोलीत जाऊन सोशल मीडिया पाहिले. दरम्यान, मला एक संदेश आला की, तू एक चांगला गोलंदाज आहेस, पण पुढचा सामना खेळू नकोस. माझी ही कामगिरी त्याच भावासाठी आहे. जर मी आज खेळलो नसतो तर मी ही कामगिरी करू शकलो नसतो. एका सामन्यात खराब कामगिरीनंतर कुणाही वाईट होत नाही. थोडा सपोर्ट करत जा."
bowling performance
win of the season
Interesting social media messageWrecker-in-chief @deepak_chahar9 chats with @imShard after @ChennaiIPL's win at Wankhede. - By @NishadPaiVaidya #VIVOIPL #PBKSvCSK @Vivo_India
Full interview https://t.co/y51FcTVFNS pic.twitter.com/tjk6x2FObh
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2021
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार एमएस धोनी आयपीएलमधील आपला विजय नोंदवल्यानंतर म्हणाला की, दीपक चाहर (Deepak Chahar) हा डेथ ओव्हर गोलंदाज म्हणून खूप अनुभवी झाला आहे. त्यामुळे त्याची अशी इच्छा आहे की, दीपक चहरने पॉवर प्ले मध्ये देखील खेळावे.
पंजाब किंग्ज विरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर, त्या मॅचमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चाहरला 'प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून निवडले गेले, त्याने 4 ओव्हरमध्ये 4 बळी घेतले आहे.