अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) मधील 11 वा सामना आज दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. लागोपाठ 2 सामन्यात मिळालेल्या विजयानंतर दिल्लीचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ देखील विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. डेविड वार्नरच्या नेतृत्वात हैदराबादची टीम पहिल्या विजयासाठी आज प्रयत्न करेल.
दिल्लीने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब आणि चेन्नईला पराभूत करण्यात दिल्ली संघाला यश आलं होतं.
दिल्लीसाठी रबाडा आणि एनरिक नार्जे तसेच अक्षर पटेल आणि अमित मिश्राने रविचंद्रन अश्विनच्या अनुपस्थिति चांगली कामगिरी केली आहे. तर शिखर धवन आणि पृथ्वी शॉवर चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असेल. ऋषभ पंत आणि अय्यरने चेन्नईच्या विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. मार्कस स्टोइनिसने देखील आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
हैदराबादच्या संघाला चांगली कामगिरी करुन दाखवण्याची गरज आहे. मध्यम फळीतील बॅट्समन आतापर्यंत फ्लॉप ठरले आहेत. नबीने बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण नबीच्या जागी केन विलियमसनला संघात घेतलं जाऊ शकतं.
राशिद खानने चांगला खेळ दाखवला आहे. पण इतर बॉलर्सकडून त्याला चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे हैदराबाद संघासमोर सध्या तरी दिल्लीचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे.