दुबई : आयपीएल 2020 च्या 55 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटलने 6 विकेटने आरसीबीवर विजय मिळवला आहे. या विजयासह दिल्ली आणि बंगळुरू दोन्ही संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत.
बंगळुरुकडून सलामीवीर देवदत्त पडिकलने आरसीबीकडून 50 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. एबी डिव्हिलियर्सनेही 35 धावा केल्या. दुसरीकडे, दिल्ली संघासाठी वेगवान गोलंदाज एनिच नोरत्जेने 3 आणि कॅगिसो रबाडाने 2 विकेट घेत चांगली गोलंदाजी केली.
आज रहाणेने शानदार डाव खेळला. दिल्लीच्या अजिंक्य रहाणेने 60 रन्सची शानदार खेली केली. तो वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलवर आऊट झाला. अजिंक्य रहाणेने आयपीएल कारकिर्दीतील 28 वे अर्धशतक 37 चेंडूत पूर्ण केले. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा फलंदाजीमुळे निराश केले. तो 7 रनवर आऊट झाला. शिखर धवनने 54 धावांची शानदार खेळी केली.
या महत्त्वपूर्ण सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमवत 152 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या सामन्यात दिल्लीविरूद्ध शानदार फलंदाजी करत आरसीबीच्या देवदत्त पडिक्कलने आयपीएल कारकिर्दीतील 5 वे अर्धशतक पूर्ण केले.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने 29 धावा केल्या. तो अश्विनच्या बॉलवर आऊट झाला.