India VS South Africa T20 Series 1st Match : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात आज 8 नोव्हेंबर पासून टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली असून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण 4 टी 20 सामने खेळवले जातील. टी 20 सीरिजमधील पहिला सामना डरबनच्या किंग्समीड स्टेडियमवर खेळवला जाणार असून 2024 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कप फायनलनंतर प्रथमच साऊथ आफ्रिका आणि टीम इंडिया भिडणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्ड कप 2024 चं विजेतेपदं पटकावलं. या स्पर्धेतील फायनल सामना हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात आला होता. यात भारताने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारून 7 धावांनी विजय मिळवला होता. मात्र आता टी 20 वर्ल्ड कपनंतर तब्बल 4 महिन्यांनी टीम इंडिया नव्या कर्णधारासह दक्षिण आफ्रिके विरुद्ध टी 20 सीरिज खेळण्यासाठी मैदानात उतरेल. वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता सूर्यकुमार यादवकडे भारताच्या टी 20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर हे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया सोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये गौतम गंभीर ऐवजी वीवीएस लक्ष्मण टीम इंडियाचे हेड कोच असतील.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यांच्याच मैदानावर भारतीय संघाचा टी 20 सामन्यांचा रेकॉर्ड चांगला आहे. दोन्ही संघांमध्ये अजूनपर्यंत 27 टी 20 सामने झाले असून ज्यापैकी 15 सामने भारताने जिंकले तर 11 सामन्यात त्यांचा पराभव झाला. तर दक्षिण आफ्रिकेत खेळल्या सामन्यात भारताने 15 पैकी 10 सामन्यात विजय मिळवला तर 5 सामन्यात त्यांचा पराभव झाला. याच देशात भारताने 2007 मध्ये टी 20 वर्ल्ड कप सुद्धा जिंकला होता.
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तानला आणलं गुडघ्यावर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
भारत - दक्षिण आफ्रिका (पहिला सामना) : 8 नोव्हेंबर : डरबन
भारत - दक्षिण आफ्रिका (दुसरा सामना) : 10 नोव्हेंबर : गकेबरहा
भारत - दक्षिण आफ्रिका (तिसरा सामना) : 12 नोव्हेंबर : सेंचुरीयन
भारत - दक्षिण आफ्रिका (चौथा सामना) : 15 नोव्हेंबर : जोहानिसबर्ग
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 सीरिजमधील पहिला सामना हा शुक्रवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8: 30 वाजता सुरु होईल. प्रेक्षकांना या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट जिओ सिनेमावर लाईव्ह पाहायला मिळेल. तर टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनलवर हा सामना पाहू शकता.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू समसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, विजयकुमार वैशाक, आवेश खान आणि यश दयाल.