Guardian Minister: महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले आहे. यात बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद पुन्हा राष्ट्रवादीकडेच आले आहे. अदिती तटकरे यांना रायगड जिल्हाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण कोणाला पालकमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले?जाणून घेऊया.
वाशीममध्ये हसन मुश्रीफ यांना, नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटे, हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाळ, गोंदियामध्ये बाबासाहेब पाटील, बुलढाणामध्ये मकरंद पाटील यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.अजित पवार यांना बीडसह दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. अजित पवार हे बीड तसेच पुणे जिल्ह्याचे पालमंत्री बनले आहेत. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई या दोन शहरांचे पालकमंत्री असतील. गडचिरोलीचं पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत: कडे ठेवलंय. मुंबई उपनगरासाठी 2 पालकमंत्री असणार आहेत. कोल्हापूरला 2 पालकमंत्री देण्यात आले आहेत. तसेच नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर असणार आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली नाहीय. संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने मुंडे यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. मुंडेंना पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी जोर धरत होती. मंत्री दत्तामामा भरणे यांना देखील पालकमंत्री पदापासून वंचित ठेवल्याने आले आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्री होण्याची इच्छा होती. त्यांनी वारंवार ती बोलूनही दाखवली होती. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.