Big Breaking : अजित पवार बीडचे पालकमंत्री; धनंजय मुंडे यांना पहिला मोठा धक्का

Dhananjay Munde : सरकारकडून अखेर पालकमंत्र्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत धनंजय मुंडे यांचे नाही. अजित पवार यांना बीडचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 18, 2025, 10:14 PM IST
Big Breaking : अजित पवार बीडचे पालकमंत्री; धनंजय मुंडे यांना पहिला मोठा धक्का title=

Maharashtra Guardian Ministers :  संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडें यांना पहिला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित पालकमंत्री पदांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत धनंजय मुंडे यांचे नाव कुठेच नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीडचे पालकमंत्री करण्यात आले आहे. सरकारकडून अखेर पालकमंत्र्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

अजित पवार यांना बीडसह दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. अजित पवार हे बीड तसेच पुणे जिल्ह्याचे पालमंत्री बनले आहेत. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई या दोन शहरांचे पालकमंत्री असतील. गडचिरोलीचं पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत: कडे ठेवलंय. 

मुंबई उपनगरासाठी 2 पालकमंत्री असणार आहेत. कोल्हापूरला 2 पालकमंत्री. नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरेंना देण्यात आले.  गोगवालेना संधी नाहीच.  संजय शिरसाट संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. वाशीमचे पालमंत्री पद हसन मुश्रीफ,  नंदुरबारचे पालमंत्रीपद माणिकराव कोकाटे, हिंगोलीचे पालमंत्रीपद नरहरी झिरवाळ, गोंदियाचे पालकमंत्रीपद बाबासाहेब पाटील, बुलढाणाचे पालकमंत्रीपद मकरंद पाटील यांना देण्यात आले आहे.