IPL 2024 Mumbai Indians Playoffs Scenario : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएन्ट्स (MI vs LSG) यांच्यात झालेल्या सामन्यात लखनऊने मुंबईला धूळ चारली अन् आपला 6 वा विजय नोंदवला. लखनऊने 4 विकेट्स राखून सामना खिशात घातला. त्याचबरोबर लखनऊने पाईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) मोठी झेप घेतली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनऊचा संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्यांच्याकडे आता 12 पाईंट्स आणि +0.094 असा नेट रननेट आहे. तर दुसरीकडे मुंबईची नाव बुडाल्याचं दिसून येतंय. मुंबईचा संघ केवळ 6 अंकांसह पाईंट्स टेबलच्या 9 व्या स्थानी विराजमान आहे. मुंबईचा नेट रननेट -0.272 इतका झालाय. त्यामुळे आता मुंबईच्या खेळाडूंनी गाशा गुंडाळलाय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचं समीकरण (Mumbai Indians Playoffs Scenario)
मुंबई इंडियन्सला इथून पुढे जर प्लेऑफ गाठायचं असेल तर त्यांना उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा आगामी सामना हैदरबादविरुद्ध होणार आहे. तर केकेआर आणि लखनऊविरुद्ध एक एक सामना बाकी आहे. त्यामुळे आता मुंबईला प्लेऑफसाठी या दोन्ही संघांना कडवी टक्कर द्यावी लागेल. एवढ्यावरच भागणार नाही तर, मुंबईला आता बाकी संघांची देखील मदत लागणार आहे.
मुंबईला प्लेऑफ गाठायचं असेल तर, कोणत्या संघाची कशी कामगिरी हवी?
पलटणला प्लेऑफ गाठायचं असेल तर कोलकाताला उर्वरित 5 पैकी 4 सामने तरी कमीत कमी हारावे लागतील. त्यात कोलकाताचा नेट रननेट कमी असावा लागेल.
लखनऊला आता उर्वरित 4 सामन्यतील 3 सामन्यात मात खावी लागेल. त्यांना देखील त्यांचा नेट रननेट कमी करावा लागेल.
जर चेन्नई आणि हैदराबाद उर्वरित 5 सामन्यंपैकी 3 सामन्यात पराभूत झाली तर मुंबईला प्लेऑफसाठी संधी मिळू शकते.
दिल्लीला देखील एका पराभवाला सामोरं जाता आलं तर मुंबईला प्लेऑफची संधी मिळू शकते.
पंजाब आणि गुजरात जर उर्वरित सामन्यांपैकी 3 सामने हारली तर मुंबईसाठी प्लेऑफ नजरेत येऊ शकतो.
वरील सर्व समीकरणं जुळली तरच मुंबईला प्लेऑफची संधी मिळणार आहे. मात्र, सध्याची टफ फाईट पाहता. मुंबईने आता प्लेऑफला रामराम ठोकलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या हंगामात खराब प्रदर्शन केल्याचं दिसून आलंय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईने काय चुका केल्या? याचा हिशोब पलटणला करावा लागणार आहे.
लखनऊ सुपर जाएन्ट्स - केएल राहुल (C/W), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव.
मुंबई इंडियन्स - इशान किशन (W), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), नेहल वढेरा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.