WTC Points Table : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर 11 जून 2025 रोजी खेळवली जाणार आहे. तब्बल दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सध्या भारत, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका आणि श्रीलंका या तीन संघांमध्ये मोठी शर्यत आहे. सध्या भारत - ऑस्ट्रेलियामध्ये (India VS Australia) सुरु असलेली 5 टेस्ट सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) ही दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची आहे. या सिरीजमध्ये आतापर्यंतचे 3 सामने खेळवण्यात आले असून यापैकी एका सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. तर तिसरा सामना ड्रॉ झाल्याने सध्या सीरिज 1-1 अशा बरोबरीत आहे. तेव्हा टीम इंडिया WTC Final मध्ये पोहोचणार का या? WTC फायनलचं समीकरण नेमकं कसं आहे याबाबत जाणून घेऊयात.
सध्या WTC Final चं समीकरण पाहिलं तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिज जिंकावी लागेल. सध्या टेस्ट सीरिज 1-1 अशा बरोबरीत आहे. परंतु जर टीम इंडियाने 3-1 अशा फरकाने ही सीरिज जिंकली तर ते थेट WTC फायनलसाठी क्वालिफाय होतील. पण जर हीच सीरिज 2-2 वर ड्रॉ झाली तर टीम इंडियाला दुसऱ्या संघांच्या परफॉर्मन्सवर अवलंबून राहावं लागेल. टीम इंडिया यापूर्वी दोनदा WTC फायनलमध्ये पोहोचली परंतु दोन्ही वेळा त्यांच्या पदरी अपयश आलं. पहिल्यांदा न्यूझीलंड तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाकडून त्यांना WTC फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं.
हेही वाचा : रोहित शर्माच्या दुखापतीबाबत आली मोठी अपडेट! मेलबर्न टेस्टमध्ये खेळणार की नाही स्पष्टच सांगितलं
साऊथ आफ्रिका WTC Final साठी एक प्रबळ दावेदार आहे. साऊथ आफ्रिका सध्या WTC Points Table मध्ये नंबर 1 वर असून टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एका विजयाची आवश्यकता आहे. साऊथ आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. जर या सीरिजमधील एकही सामना साऊथ आफ्रिका जिंकली तर ते WTC फायनलमधील स्थान पक्कं करतील. पाकिस्तान WTC Final साठीच्या शर्यतीतून बाहेर आहे. परंतु पाकिस्तान ही सीरिज जिंकली भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांना फायदा मिळेल.
ऑस्ट्रेलियाला भारतानंतर श्रीलंकेसोबत देखील दोन टेस्ट सामने खेळायचे आहेत. जर श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया WTC Final च्या रेसमधून बाहेर पडेल. मग या संघाची साऊथ आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नजर असेल. जर पाकिस्तानने 2-0 ने साऊथ आफ्रिकेला हरवले आणि श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 2-0 ने हरवले तर भारत श्रीलंका या दोन संघांमध्ये WTC फायनल होऊ शकते.