मुंबई : ग्रीनप्लाय या भारतातील सर्वात मोठ्या इंटीरियर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने लखनौ सुपर जायंट्ससोबत सहभागिता केली आहे आणि उत्तर प्रदेशाच्या प्रादेशिक अस्मितेला सलग्न होण्यासाठी "जलवा दिखेगा" हे विशेष गीत तयार केले आहे. या गाण्यात खेळाची आणि राज्याची अंतरात्मा समाविष्ट आहे. लोकसंग्रहाद्वारे प्राप्त सामग्री ने हे गीत तयार करण्यात आलेले असल्यामुळे त्यामुळे जास्त प्रतिबद्धता निर्माण होईल.
श्री सानिध्य मित्तल, जेएमडी, ग्रीनप्लाय सांगतात, "ऑन-ग्राउंड ऍक्टिव्हेशन मुळेआमच्या प्रेक्षकांमध्ये प्रादेशिक अस्मिता जिवंत करण्यात आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांशी जोडले जाण्यात मदत मिळेल.
प्रेक्षकांच्या पर्यंत जास्त पोहोचण्या साठी आणि जवळीक निर्माण करण्यासाठी आम्ही सोशल मीडियावर अनेक ग्राहक कनेक्ट उपक्रम देखील आयोजित करणार आहोत.”
ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज लिमिटेड ही प्लायवूड, ब्लॉक बोर्ड, फ्लश डोअर्स, डेकोरेटिव्ह व्हीनियर्स, पीव्हीसी आणि इतर संबंधित उत्पादनांची निर्मिती आणि विपणन करणारी भारतातील अग्रगण्य अंतर्गत पायाभूत सुविधा कंपनी आहे.
कंपनीने फ्रँचायझीचे सहयोगी भागीदार म्हणून T20 स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्स या उत्तर प्रदेशातील पहिल्या संघाशी सहभागिता केली आहे.
या सहभागीतेनुसार लखनौ सुपर जायंट्स संघाचे खेळाडू आणि अधिकृत सदस्य त्यांच्या अधिकृत मॅच डे जर्सीवर छातीच्या उजव्या बाजूच्या ग्रीनप्लाय कंपनीचा लोगो लावतील.
स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 360-डिग्री प्रचार मोहिमे द्वारे सहभागितेचा विस्तारही केला जाईल.
ग्रीनप्लाय ही अंतर्गत पायाभूत सुविधा क्षेत्रातील दिग्गज कंपनी त्यांच्या व्यवसायातील तसेच प्रभावशाली भागीदारांसाठी ऑनलाइन गेम देखील आयोजित करेल, ज्यामुळे त्यांच्यात अधिक प्रतिबद्धता निर्माण होईल.
भारतातील 28 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमधील 900 पेक्षा जास्त शहरे, गावे आणि खेड्यांमध्ये कंपनीची सुव्यवस्थित वितरण नेटवर्कद्वारे व्यापक उपस्थिती आहे.
लाकूड आणि पॅनेल उद्योगातील ग्रीनप्लाय ही पहिली कंपनी आहे जिने तिझिट, नागालँड येथील वृक्षारोपणासाठी फॉरेस्ट स्टीवर्डशिप कौन्सिल (FSC®) कडून यशस्वीरित्या FSC® – FM (फॉरेस्ट मॅनेजमेंट) प्रमाणपत्र मिळवले आहे. या प्रमाणपत्राद्वारे पर्यावरणीय हार्मनी राखण्याचे आमचे उद्दिष्ट
अधोरेखित होते आणि ग्राहकांना खात्री होते की त्यांनी खरेदी केलेली उत्पादने पर्यावरणपूरक शाश्वत स्त्रोत वापरून तयार केलेली आहेत. ग्रीनप्लाय ही लाकूड आणि पॅनेल उद्योगातील पहिली कंपनी आहे जिने ग्राहकांचे आरोग्य हित लक्षात घेऊन शून्य उत्सर्जन (E-0) उत्पादनांची श्रेणी विकसित केली आहे. या उत्पादनांमुळे फॉर्मल्डिहाइड उत्सर्जन नगण्य किंवा शून्य होते आणि घरातील हवेची गुणवत्ता अबाधित राहते.
उत्पादनातील नवकल्पनांसाठी कंपनी नेहमीच आघाडीवर राहिली आहे, मग ते 4 प्रेस टेक्नॉलॉजी आणि पेंटा 5 टेक असो, दोषमुक्त उत्पादने तयार करणे असो, किंवा सुरक्षित आरोग्यासाठी विषाणू आणि जीवाणूंशी लढणारी विराशिल्ड लॉन्च करणे असो. आणि आता कंपनी सादर करत आहे E0 इनोव्हेशन द्वारे आरोग्य सुरक्षित उत्पादने.
Disclaimer: Brand Desk Content