Asia Cup 2022 : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये भुवनेश्वर कुमारने 4 विकेट्स घेत पाकिस्तान संघाला बॅकफुटवर ढकललं. भारताकडून सर्वाधिक 4 गडी बाद करत भुवनेश्वरने सामन्यामध्ये आपली छाप पाडली. याच भुवनेश्वर कुमारवर माजी खेळाडू सुनील गावसरकर यांनी त्याच्या भविष्यातील क्रिकेट खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
जानेवारी 2021 महिन्यातील भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नव्हता. तेव्हा, भुवनेश्वरचा वेग कमी झाला असून त्याच्याकडे असलेली अचूकताही दिसत नव्हती. ज्या पद्धतीने चेंडू स्विंग करून विकेट घेत होता तशा पद्धतीचं प्रदर्शन तो विसरून गेला आहे. त्यामुळे मला त्याच्या भविष्यातील कारकिर्दीबद्दल काय होईल माहित नाही, असं सुनील गावसरकर म्हणाले होते. मात्र त्याने आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली आहे.
भुवनेश्वरचं कमबॅक
भुवनेश्वरने त्यानंतर जबरदस्त कमबॅक करत आयपीएलमध्येही कामगिरी केली. IPL मधील कामगिरीच्या जोरावर भुवनेश्वरने पुन्हा भारतीय संघात जागा मिळवली. त्यानंतर परदेश दौऱ्यावरही भुवनेश्वरने धमाकेदार प्रदर्शन केलं आणि आशिया कपच्या स्कॉडमध्ये स्थान मिळवत आजच्या पाकिस्तानविरोधात कमालीचं प्रदर्शन केलं. आजच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने त्याच्यावर टीका करणाऱ्यांची त्याने तोंडं बंद केली आहेत.
दरम्यान, पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, शादाब खान, असीफ अली आणि मोहम्मद शहा यांना बाद केलं.