Champions Trophy 2025 : बहुचर्चित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात झाली असून टीम इंडिया त्यांचा स्पर्धेतील पहिला सामना हा 20 फेब्रुवारी रोजी खेळणार आहे. भारताचा पहिला सामना हा बांगलादेश सोबत होणार असून हेड कोच गौतम गंभीरसाठी (Gautam Gambhir) ही टूर्नामेंट सोपी नसेल. परंतु तरीही चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत (Champions Trophy 2025) गंभीर टेन्शन फ्री दिसतोय, दुबईमधील त्याचे काही फोटो व्हायरल होत असून त्यात गंभीरचा अंदाज पाहून नेटकरी संतापले आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिज जिंकल्यावर टीम इंडिया दुबईत चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी रवाना झाली. सध्या खेळाडू सराव मैदानात घाम गाळताना दिसतायत. गंभीरने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला ज्यात तो गुलाबजामचा आनंद घेताना दिसला. याला त्याने कॅप्शन दिले की, 'आयुष्य थोडं आहे त्याला गोड बनवा'. तर 18 जानेवारी रोजी गंभीरने त्याच्या एक्स अकाउंटवर छावा चित्रपटाविषयी पोस्ट केली. यात त्याने लिहिले 'छत्रपती संभाजी महाराज, यांचं मातृभूमीसाठी समर्पण'. या दोन पोस्टनंतर नेटकरी गंभीरला ट्रोल करत आहेत.
'छावा' आणि 'गुलाबजाम' वर केलेल्या पोस्टमुळे गंभीर ट्रोल आर्मीच्या निशाण्यावर आला. फॅन्स त्याच्यावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या पराभवाचं खापर फोडताना दिसत आहे. एका यूजरने लिहिले, 'बहू आता चॅम्पियन्स ट्रॉफी नको हरवू'. तर एकाने लिहिले, 'कोचिंग कर भाऊ काय सिनेमा बघतोयस'.
हेही वाचा : Champions Trophy 2025: आज पाकिस्तान हरला तर सेमी फायनलमध्ये पोहोचणार भारत? असं आहे संपूर्ण समीकरण
ग्रुप ए - पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश
ग्रुप बी - दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड
20 फेब्रुवारी : गुरुवार - भारत विरुद्ध बांगलादेश - ठिकाण : दुबई
23 फेब्रुवारी : रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान - ठिकाण : दुबई
2 मार्च : रविवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड - ठिकाण : दुबई
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, वॉशिंगटन सुंदर.
नॉन-ट्रॅवलिंग सब्स्टीट्यूट: यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे