FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विजेता येत्या दोन दिवसात ठरणार आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्सनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विश्वचषकावर कोण नाव कोरतं? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. असं असताना वर्ल्डकप ट्रॉफीबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. दुसरीकडे या ट्रॉफीवर चोरांची देखील नजर असते. फीफा वर्ल्डकपच्या 92 वर्षांच्या इतिहासात वर्ल्डकप ट्रॉफी दोन वेळा चोरी झाली आहे. एक ट्रॉफी मिळाली असून एका ट्रॉफीचा अजूनही सुगावा लागलेला नाही. फीफा वर्ल्डकप स्पर्धेचं 1930 मध्ये पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 1966 मध्ये इंग्लंडमध्ये फीफा वर्ल्डकप होणार होता. तेव्हा ट्रॉफी सेंट्रल लंडनच्या वेस्टमिंस्टर हॉलमध्ये ठेवली होती. मात्र स्पर्धा सुरु होण्याच्या तीन आठवड्यांपूर्वी ट्रॉफी चोरीला गेली. ही ट्रॉफी 6 दिवस पोलिसांच्या हाती लागली नाही. मात्र सातव्या दिवशी एका गार्डनमध्ये पेपरमध्ये गुंडाळलेली सापडली. ही ट्रॉफी एका कुत्र्याने शोधून काढली.
1930 साली स्पर्धा सुरु झाल्यानंतर फीफा समितीने जो संघ तीन जेतेपद जिंकेल त्याला ट्रॉफी देण्याचा निर्णय घेतलाय. 1970 मध्ये ब्राझीलने तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला आणि त्यांना ट्रॉफी दिली गेली. ब्राझीलने हा चषक फुटबॉल महासंघाच्या रियो डि जिनेरियोमध्ये एका बुलेट प्रूफ काचेत ठेवली होती. मात्र 19 डिसेंबर 1983 ला या चषकाची चोरी झाली. मात्र चोरांचा पत्ता लागलाच नाही. काही जणांच्या मते ही ट्रॉफी वितळवून सोनं मिळवलं असेल.
बातमी वाचा- FIFA World Cup 2026 स्पर्धेत भारताला मिळणार संधी! इतके संघ होणार सहभागी
फीफा वर्ल्डकप ट्रॉफी इटलीच्या प्रसिद्ध शिल्पकार सिल्वियो गाजानिगा यांनी बनवली होती. 18 कॅरेट सोन्यामध्ये 14.2 इंच लांब ट्रॉफी बनवली होती. याचं वजन 6.175 किलोग्रॅम होतं. 1970 पर्यंत ही ट्रॉफी फीफाचे माजी अध्यक्ष जूल्स रिमे यांच्या नावाने ओळखली जात होती.