मुंबई : टी-20 क्रिकेटच्या यशानंतर आता क्रिकेटचा नव्या फॉरमॅटचा जन्म होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आता १०० बॉल क्रिकेटची तयारी करत आहे. ईसीबीनं या नव्या फॉरमॅटला परवानगीही दिली आहे. हा फॉरमॅट काऊंटी क्रिकेटमध्ये २०२० सालापासून सुरु होणार आहे. सध्या काऊंटीमध्ये टी-20 क्रिकेट खेळलं जात आहे. टी-20 मध्ये प्रत्येक टीम १२० बॉलचा सामना करतं. १०० बॉलच्या या फॉरमॅटसाठी ८ टीमची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. क्रिकेटचा हा नवा फॉरमॅट एकदम नवीन कल्पना असल्याची प्रतिक्रिया ईसीबीचे अध्यक्ष टॉम हेरिसन यांनी दिली आहे. या फॉरमॅटमुळे क्रिकेट आणि लोकप्रिय आणि आकर्षक होईल आणि युवक क्रिकेटकडे आकर्षित होतील, असा विश्वासही हेरिसन यांनी बोलून दाखवला आहे.
- १०० बॉलच्या क्रिकेटमध्ये १६-१६ ओव्हरची मॅच असेल. यातल्या पहिल्या १५ ओव्हर ६-६ बॉलच्या असतील.
- या फॉरमॅटमधली शेवटची ओव्हर १० बॉलची असेल.
- ही मॅच टी-20 मॅचपेक्षा ४० मिनिटं लवकर संपेल.
- २०२० साली होणाऱ्या या स्पर्धेत ३८ दिवस ३६ मॅच होतील.
- ६ बॉलच्या ओव्हरला १९७९मध्ये सुरुवात झाली. याआधी एक ओव्हर चार, पाच, सहा आणि आठ बॉलची असायची.
- ईसीबीनं २००३मध्ये सगळ्यात आधी टी-20 क्रिकेटची सुरुवात केली होती. आता १०० बॉलचा फॉरमॅटही ईसीबीच घेऊन आलं आहे. काही ठिकाणी १०-१० ओव्हरच्या क्रिकेट मॅचही खेळल्या जातात, पण या फॉरमॅटला अधिकृत मान्यता मिळालेली नाही.