मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा मैदानावरचा राग पुन्हा एकदा स्टंम्पच्या माईकमध्ये कैद झाला आहे. विजय असो की पराभव धोनी मैदानावर नेहमी कूल असतो. मैदानावर खेळाडूंना सूचना देण्याचं काम धोनी खूपच वेगळ्या अंदाजात करतो. धोनी क्रिकेटच्या मैदानावर नेहमी जागृत असतो. कर्णधारपद नसताना देखील तो कर्णधाराला सूचना करताना नेहमी दिसतो. महेंद्र सिंह धोनी विकेट्सच्या मागे कमेंट करण्यासाठी देखील ओळखला जातो. आशिया कप 2018 मध्ये अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याचा आवाज पुन्हा एकदा माईकमध्ये कैद झाला आहे.
रोहित शर्मा आणि शिखर धवनला या सामन्यात विश्रांती दिली गेली होती. धोनीकडे यासामन्याची जबाबदारी होती. धोनीने या सामन्यात कर्णधाराची भूमिका बजावली. जेव्हा कुलदीप यादव गोंलदाजी करत होता. तेव्हा फिल्डींग लावत असताना तो बराच वेळ घेत होता. तेव्हा धोनीने त्याला सूचना दिली.
"Bowling karega ya bowler change karein" MS Dhoni to Kuldeep Yadav pic.twitter.com/Sb7mKOporI
— Khurram Siddiquee (@iamkhurrum12) September 25, 2018
महेंद्र सिंह धोनीचा कर्णधार म्हणून हा 200 वा सामना होता. धोनीने वनडेमध्ये शेवटचं कर्णधारपद न्यूझीलंडविरुद्धच्या सीरीजमध्ये भूषवलं होतं. 200 वनडेमध्ये कर्णधारपद भूषवणारा धोनी तिसरा कर्णधार आहे. रिकी पॉटिंगने 230 वनडे मध्ये तर न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगने 218 वनडेमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. मंगळवारी अफगाणिस्तान आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला चांगलीच टक्कर दिली आणि सामना ड्रॉ झाला.