दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी घडामोड, गांगुली आणि पॉन्टिंग बाहेर, 'या' दोन दिग्गजांची एन्ट्री

IPL 2025 Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा मेंटॉर असलेल्या माजी क्रिकेटर सौरव गांगुली आणि हेड कोच असलेल्या रिकी पॉन्टिंगला बाहेरचा रस्ता दाखवला असून त्यांची रिप्लेसमेंट गुरुवारी जाहीर केली आहे. 

पुजा पवार | Updated: Oct 17, 2024, 04:59 PM IST
दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी घडामोड, गांगुली आणि पॉन्टिंग बाहेर, 'या' दोन दिग्गजांची एन्ट्री title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 Delhi Capitals : आयपीएल 2025 पूर्वी सर्व फ्रेंचायझी त्यांची संघ बांधणी करत असून सपोर्ट स्टाफमध्ये देखील मोठे बदल केले जात आहेत. दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा मेंटॉर असलेल्या माजी क्रिकेटर सौरव गांगुली आणि हेड कोच असलेल्या रिकी पॉन्टिंगला बाहेरचा रस्ता दाखवला असून त्यांची रिप्लेसमेंट गुरुवारी जाहीर केली आहे. 

मागील दोन वर्षांपासून सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर तर रिकी पॉन्टिंग हेड कोच होते, परंतु यांच्या कारकिर्दीत दिल्लीची टीम आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करू शकली नाही. बऱ्याचदा आयपीएल पॉइंटेबलमध्ये ते खालच्या स्थानी राहिले. तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने या दोघांबाबत गुरुवारी मोठा निर्णय जाहीर केला. यानुसार भारताचा माजी क्रिकेटर वेणुगोपाल राव याची नियुक्ती दिल्ली कॅपिटल्सचा डिरेक्टर ऑफ क्रिकेट आणि हेमांग बदानी यांची नियुक्ती हेड कोच म्हणून करण्यात आली आहे. या दोघांची कारकीर्द पुढील दोन वर्षांसाठी असेल. 

delhi capitals

हेही वाचा : आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आली समोर, कुठे आणि कधी होणार आयोजन?

 

हेमंग बदानी आणि वेणुगोपाल राव हे खूप वर्षांपासून चेन्नई लीगमध्ये MRF साठी खेळले. याशिवाय दोघांना नेहमी एकत्र काम करण्यासाठी ओळखलं जायचं. दोघेही फ्रेंचायझीच्या सब्सिडियरी संघासाठी काम करत होते. खासकरून यूएईची ILT20 आणि अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये दोघे फ्रेंचायझीचे काम पाहायचे. आता दोघांना दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी जबाबदारी देण्यात आलीये. दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटने त्यांना नव्या जबाबदारी सह कोचिंग स्टाफ निवडण्याची सुद्धा खुली सूट दिली आहे. बदानी आणि वेणुगोपाल यांच्याशिवाय टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल देखील दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होऊ शकतो. फ्रँचायझी त्याला आयपीएलमध्ये बॉलिंग कोच बनवू शकते.