जादू-टोण्यामुळे भारताचा विजय, पाकिस्तानी टीमचा हास्यास्पद दावा

अंडर १९ वर्ल्ड कपवर भारतानं चौथ्यांदा नाव कोरलं.

Updated: Feb 4, 2018, 10:49 PM IST
जादू-टोण्यामुळे भारताचा विजय, पाकिस्तानी टीमचा हास्यास्पद दावा  title=

कराची : अंडर १९ वर्ल्ड कपवर भारतानं चौथ्यांदा नाव कोरलं. फायनलमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवलं. तर सेमी फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारली. भारताच्या या विजयावर पाकिस्तानी टीमचा मॅनेजर आणि माजी क्रिकेटपटू नदीम खाननं हास्यास्पद दावा केला आहे. जादू-टोण्यामुळे भारताचा विजय झाल्याचं नदीम म्हणालाय.

भारताविरुद्धचा सामना रोमांचक होईल, असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. पण पाकिस्तानी टीम ५९ रन्सवर ऑल आऊट झाली. मला वाटतं टीमवर काळी जादू करण्यात आली होती. मैदानात काय चाललं आहे हेच आमच्या बॅट्समनना कळत नव्हतं, असा रडीचा डाव नदीम खाननं खेळला आहे. नदीम खान हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोईन खानचा भाऊ आहे. नदीम १९९९च्या भारत दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी टीमचा भाग होता.

अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 203 धावांनी धुव्वा उडवला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ  69 धावांत गुंडाळण्यात आला.  पाकिस्तानला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केलाय. फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. भारताची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मनोज कार्ला यांनी चांगली भागीदारी केली. शॉने ४१ धावा केल्या तर कार्लाने ४७ धावांची खेळी केली.

शुभम गिलने ९४ बॉल खेळताना नाबाद १०२ धावा केल्या. यात त्याच्या ७ चौकारांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानला केवळ 69 धावा करता आल्या. भारताच्या इशान पोरेल याने ४ विकेट घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार लावण्यात यश मिळवले. त्याला साथ दिली आर  परागने त्याने दोन विकेट घेतल्या.