Rohit Sharma: रोहित गजनीपेक्षाही वरताण; टॉसनंतर 'हे' विसरला...पाहा मजेशीर VIDEO

Rohit Sharma: न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा टॉसनंतर गोलंदाजी करायची की फलंदाजी या बाबतीत गोंधळला होता. दरम्यान असंच काहीसं चित्र अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दिसून आलं. सध्या कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

सुरभि जगदीश | Updated: Jan 13, 2024, 11:47 AM IST
Rohit Sharma: रोहित गजनीपेक्षाही वरताण; टॉसनंतर 'हे' विसरला...पाहा मजेशीर VIDEO  title=

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची विसरण्याची सवय आता जगजाहिर आहे. कधी अंगठी, कधी पासपोर्ट तर कधी आयपॅड या गोष्टी आतापर्यंत विसरलेला आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा टॉसनंतर गोलंदाजी करायची की फलंदाजी या बाबतीत गोंधळला होता. दरम्यान असंच काहीसं चित्र अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दिसून आलं.

टॉसदरम्यान खेळाडूंचं नाव विसरला रोहित

सध्या कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये टॉस झाल्यानंतर कमेंट्रिटर मुरली कार्तिकने रोहित शर्माला विचारलं की, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश केला गेलेला नाही. पण यावेळी तो खेळाडूंची नावंच विसरून गेल्याचं दिसून आलं. 

या व्हिडओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि आवेश खान यांची नाव रोहित शर्माने बरोबर घेतली. मात्र यावेळी तो एक नाव विसरला होता. रोहित कार्तिकला म्हणाला की, मी टॉसपूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर कार्तिकने त्याला कुलदीपच्या नावाची आठवण करून दिली. रोहित शर्माचा हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांना आवडत असून हिटमॅन मात्र विसरभोळेपणाला काहीही करू शकलेला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@cricketbazz.in)

रोहितची विसरण्याची काही पहिली वेळ नव्हे 

टॉस दरम्यान रोहित शर्मा काहीतरी विसरण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही त्याने असं केलं आहे. गेल्या वर्षी जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची हे रोहित शर्मा विसरला होता. तसंच यापूरवी तो पासपोर्ट, अंगठी इत्याी गोष्टीही विसरला आहे. विराट कोहलीनेही त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की, रोहित शर्माला गोष्टी विसरण्याची सवय आहे. तो त्याचा मोबाईल, लॅपटॉप या गोष्टी कुठेही विसरून येऊ शकतो.

पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा विजय

अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी-20 सामना टीम इंडियाने जिंकल. या विजयासह भारताने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरली होती. या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमवून 158 रन्स केले. यावेळी टीम इंडियाला विजयासाठी 159 रनचं आव्हान मिळालं. टीम इंडियाच्या शिलेदारांनी हे आव्हान भारताने 17.3 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमवून सामना जिंकला.