Asia Cup 2022 : आशिया कप स्पर्धेत ग्रुप स्टेजमधले सामने 2 सप्टेंबरला संपणार असून त्याच दिवशी कोणत्या दोन टीम स्पर्धेतून बाहेर होतील हे ठरणार आहे. UAE मध्ये सुरु असलेल्या एशिया कप स्पर्धेत एकूण 6 संघांनी भाग घेतला आहे.
श्रीलंका (Sri Lanka) किंवा बांगलादेश (Bangladesh) यो दोन संघांपैकी एका संघाला एशिया कपच्या 15 व्या हंगामातून बाहेर पडावं लागणार आहे. कारण अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव करत सुपर 4 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. तर श्रीलंका आणि बांगलादेशकडे आता केवळ एक संधी उरली आहे.
श्रीलंका आणि बांगलादेशदरम्यान गुरुवारी म्हणजे 1 सप्टेंबरला ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना खेळला जाईल. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये एन्ट्री करेल. आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचा एशिया कपमधला प्रवास तिथेच संपेल. दुसरीकडे ग्रुप एचा निकाल 2 सप्टेंबरला लागेल. पाकिस्तान (Pakistan) आणि हाँगकाँग (Hongkong)दरम्यानच्या सामन्यात विजेता संघ सुपर 4 मध्ये आपली जागा निश्चित करेल.
अपगाणिस्तानची आश्चर्यकारक कामगिरी
एशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात बलाढ्य श्रीलंकेला तर दुसऱ्या सामन्यात चुरशीच्या लढतीत बांगलादेशचा पराभव करत सुपर 4 मध्ये एन्ट्री केली. सलग दोन विजयांमुळे अफगाणिस्तान संघाचं मनोबल चांगलंच वाढलं आहे. सुपर 4 मध्ये भारताची (Team India) अफगाणिस्ताशी गाठ पडण्याची शक्यता आहे.