मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये नो बॉलवरून बराच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बंगळुरू विरुद्ध गुजरात झालेल्या सामन्यातही नो बॉलवरून वाद झाला. या सामन्यात कोहली अंपायरवर संतापल्याचं पाहायला मिळालं.
आतापर्यंत खेळाडूंनी नो बॉल टाकल्याचं पाहिलं असेल पण कीपरच्या चुकीमुळे नो बॉल दिल्याचं पाहिलं नसेल. तसाच प्रकार या सामन्यात घडला. ज्यामुळे विराट कोहलीचा पारा मैदानात चढला आणि तो अंपायरवर चिडला.
विकेटकीपरची एक चूक कॅमेऱ्यात पकडली गेली आणि त्यामुळे तो बॉल नो बॉल करण्यात आला. बंगळुरूच्या विकेटकीपरची चूक असल्याने हा सगळा प्रकार घडला. या सामन्यात पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
अनुज रावत विकेटकीपिंगसाठी आला. त्यावेळी शहबाज अहमद बॉलिंग करत होता. शुभमन गिल फलंदाजी करत होता. त्याने आऊटसाठी अपिल केलं. मात्र गिलने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये बॉल बॅटला लागलाच नाही तर थेट कीपरच्या हातात गेल्याचं दिसलं. त्यामुळे तो नो बॉल देण्यात आला.
अंपायरच्या निर्णयावरून विराट कोहली वाद घालताना दिसला. थर्ड अंपायरचा निर्णय आल्यानंतर कोहलीनं फिल्ड अंपायरशी वाद घातल्याचं पाहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. त्यानंतर कोहली पुन्हा नॉर्मल झाला. मात्र काही क्षण मैदानात तणाव होता.
बंगळुरूचा पाचव्यांदा पराभव झाला. गुजरात टीमने 6 विकेट्सने बंगळुरूवर विजय मिळवला. डेव्हिड मिलरने 39 धावा केल्या. राहुल तेवतियाने 25 बॉलमध्ये 43 धावा केल्या. बंगळुरू टीमला सामना हरल्यानंतर पॉईंट टेबलवर मोठा तोटा झाला आहे.
— Patidarfan (@patidarfan) April 30, 2022