फ्रेंच ओपन : मार्टिन क्लिजनची मरेला कडवी झुंज

ब्रिटनचा अव्वल सीडेड अँडी मरेला फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या राऊंडमध्ये जाण्यासाठी चांगलेच झगडावे लागले... दुसऱ्या राऊंडमध्ये स्लोव्होकियाच्या मार्टिन क्लिजनचा 6-7, 6-2, 6-3, 7-6 नं पराभव केला... 

Updated: Jun 2, 2017, 05:44 PM IST
फ्रेंच ओपन : मार्टिन क्लिजनची मरेला कडवी झुंज title=

पॅरिस : ब्रिटनचा अव्वल सीडेड अँडी मरेला फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या राऊंडमध्ये जाण्यासाठी चांगलेच झगडावे लागले... दुसऱ्या राऊंडमध्ये स्लोव्होकियाच्या मार्टिन क्लिजनचा 6-7, 6-2, 6-3, 7-6 नं पराभव केला... 

मार्टिन क्लिजननं मरेला कडवी झुंज दिली... क्लिजनला नमवण्यासाठी मरेला 3 तास झगडावे लागले... क्लिजननं पहिला सेट 7-6 नं जिंकत अँडी मरेवर दडपण वाढवले... 

पण दुसऱ्या सेटमध्ये अँडी मरेनं 6-2 असं जोरदार कमबॅक केलं... त्यानंतर मरेनं तिसरा सेट 6-3 आणि चौथा सेट 7-6 नं जिंकत मॅचवर कब्जा केला...तिसऱ्या राऊंडमध्ये अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोशी अँडी मरेचा मुकाबला होणार आहे.