Weekly Tarot Horoscope Prediction 24 to 30 June 2024 in Marathi : टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार बुधादित्य राजयोग जूनच्या शेवटच्या आठवड्यात प्रभावी ठरणार आहे. चला तर मग हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून
टॅरो कार्ड्सनुसार या राशीचे लोक या आठवड्यात व्यावहारिक आणि प्रतिष्ठित लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. या आठवड्यात तुम्ही थोडे भावूक होणार आहात. मात्र तुम्हाला भावनिक होऊ चालणार नाही. अन्यथा, या आठवड्यात अनेक चांगल्या संधी हातातून निसटण्याची भीती आहे. रविवार दिवस घर, कौटुंबिक सुरक्षितता आणि काळजीत व्यतीत होणार आहे.
टॅरो कार्ड गणितानुसार या राशीच्या लोकांनी या आठवड्यात थोडे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या आठवड्यात तुम्हाला कोणतेही जोखमीची कामं टाळावी लागणार आहेत. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे सोमवारी दूर होणार आहे. तर सकारात्मक परिणाम तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सौम्य आणि ज्ञानाने भरलेला असणार आहे. तुम्हाला व्यवसायात नवीन यश आणि प्रगती लाभणार आहे. तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने जुन्या गोष्टी आणि सवयी सोडल्यास तुम्हाला फायदा होईल. उच्च अधिकारी तुमची क्षमता किंवा प्रतिभा तपासणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरणार आहे. साहित्य-संगीताची आवड लाभदायक असणार आहे. मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबतीत तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. इतरांसाठी तुमची उपलब्धता कायम असणार आहे.
टॅरो कार्डच्या गणनेनुसार, या राशीच्या लोकांसाठी आठवडा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. संशोधनाशी संबंधित काम हे या सप्ताहातील मुख्य पैलू असणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी थोडे महत्वाकांक्षी राहणार आहे. आर्थिक बाजू मजबूत राहील, नवीन खरेदीसाठी देखील वेळ अनुकूल असणार आहे. नवीन फायदेशीर संबंध निर्माण होणार आहे.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल नसणार आहे. तुमचा तुमच्या जोडीदारासोबत काही गोष्टींवर मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात पती-पत्नी एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसंच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेणार आहात.
या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांचे वर्तन अतिशय आक्रमक असणार आहे. या आठवड्यात वैवाहिक जीवनात काहीतरी आंबट आणि काहीतरी गोड अनुभव तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. गुरुवारी, नातेसंबंध, संधी आणि विरोध एकाच वेळी तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत.
टॅरो कार्ड्स गणित असं सांगत की, या आठवड्यात वृश्चिक राशीचे लोक, उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांशी समन्वय साधण्याची गरज असणार आहे. मात्र, रविवारी जिव्हाळ्याच्या क्षेत्रात तुम्हाला निराशेचा सामना करावा लागणार आहे. सोमवारी तुम्हाला तुमच्या अनुभवातून अनेक गोष्टींवर मात करता येणार आहे.
टॅरो कार्ड्स असं दर्शवतं की, या आठवड्यात धनु राशीचे लोक कामावर तसंच आरोग्यावर लक्ष केंद्रित करतील. या काळात कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने जीवनात आनंदच आनंद असणार आहे. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहा. जास्त खर्च करणे टाळा. याशिवाय, तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्यावे लागणार आहे. आपण त्यांच्याबद्दल विचार करत नाही असे त्यांना वाटू देऊ नका.
टॅरो कार्ड्सची गणना दर्शवित की, या आठवड्यात मकर राशीच्या लोकांचा प्रभाव खूप जास्त असणार आहे. घर किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव प्रकर्षाने जाणवणार आहे. या आठवड्यात तुमचा करिष्मा आणि सर्जनशील प्रवृत्ती शिखरावर असणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची अभ्यासाची आवड वाढणार आहे. प्रेम संबंध दृढ होणार आहे. व्यवसायात लाभ आणि प्रगतीच्या संधी तुम्हाला लाभणार आहे.
कुंभ राशीच्या नोकरदार लोकांच्या जीवनात या आठवड्यात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. तुम्ही सध्या काय करत आहात आणि तुम्ही करत असलेले संपर्क भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांना तुमची गरज भासणार आहे.
टॅरो कार्ड्सची गणना दर्शवित आहे की, मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात सर्जनशील क्षेत्रात विशेष प्रसिद्धी मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे तुम्हाला खूप आराम आणि समाधानी वाटणार आहे. आरोग्याची पूर्ण काळजी या आठवड्यात घ्यावी लागणार आहे. घर आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंददायी असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)