Trigrahi Yog In Mithun Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आणि 27 नक्षत्र आहेत. 9 ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. राहु-केतु हे ग्रह सोडले तर इतर ग्रह मेष ते मीन असा प्रवाश करतात. त्यामुळे ग्रहांचा गोचर पाठीपुढे होत असल्याने कधीकधी एकाच राशीत एकापेक्षा अधिक ग्रह येतात. ग्रहांच्या या युतीमुळे योग तयार होतात. गुरु पौर्णिमेला असाच योग मिथुन राशीत तयार होत आहे. सूर्य, शुक्र आणि बुध ग्रह मिथुन राशीत येणार असल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे. या योगामुळे तीन राशींना चांगली फळं मिळणार आहेत. जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.
वृषभ राशी: या राशीच्या गोचर कुंडलीतील दुसऱ्या स्थानात त्रिग्रही योग तयार होत आहे. या स्थानाला धन आणि वाणीचं स्थान म्हटलं जातं. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशी: या राशीच्या गोचर कुंडलीतील अकराव्या स्थानात त्रिग्रही योग तयार होत आहे. या स्थानाला उत्पन्नाचं स्थान म्हटलं जातं. या योगामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या मार्गातून पैशांची आवक वाढू शकते.
कन्या राशी: या राशीच्या गोचर कुंडलीतील दहाव्या स्थानात त्रिग्रही योग तयार होत आहे. या स्थानाला कार्यक्षेत्र आणि नोकरीचं स्थान म्हटलं जातं. यामुळे नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवी नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)