Todays Panchang : आजचा गुरूवार तुम्हा सर्वांसाठीच आनंददायी असेल. आजच्या दिवशी बऱ्याच गोष्टी तुमच्या मानासारख्याही होतील. कारण, बऱ्याच अशा वेळा आहेत ज्या तुम्हाला फळणार आहेत. आज आहे शीतला अष्टमी. अनेकजण आजच्या दिवशी व्रतवैकल्यं ठेवतात.
आजच्या दिवसा सिद्धयोगही साधला जात आहे. अशा या गुरुवारी आणखी खास काय? हे जाणून घेण्यासाठी पाहून घ्या आजचं पंचांग. इथं तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व मुहूर्त, अशुभ काळ, नक्षत्र आणि इतरही बऱ्याच गोष्टींसंदर्भातील माहिती मिळणार आहे. चला तर, पाहुया आजचं पंचांग.
आजचा वार - गुरूवार
तिथी- अष्टमी
नक्षत्र - पूर्वाषाढा
योग - शिव
करण- बालव, कौलव
सूर्योदय - सकाळी 05:58 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.45 वाजता
चंद्रोदय - दुपारी 02:07
चंद्रास्त - रात्रौ 11:26
चंद्र रास- धनु
दुष्टमुहूर्त– 10:14:09 पासुन 11:05:17 पर्यंत, 15:20:59 पासुन 16:12:07 पर्यंत
कुलिक– 10:14:09 पासुन 11:05:17 पर्यंत
कंटक– 15:20:59 पासुन 16:12:07 पर्यंत
राहु काळ– 13:57:53 पासुन 15:33:46 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 17:03:16 पासुन 17:54:24 पर्यंत
यमघण्ट–06:49:36 पासुन 07:40:44 पर्यंत
यमगण्ड– 05:58:27 पासुन 07:34:21 पर्यंत
गुलिक काळ– 09:10:14 पासुन 10:46:07 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 11:56:26 पासुन 12:47:34 पर्यंत
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल - मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा
चंद्रबल - मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)