Shani Trikon Rajyog : मोठा योग, 30 दिवसांनंतर शनी 'या' राशींचे भाग्य उजळणार

Kendra Trikone Rajyog : अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असता. ग्रह आपापल्या वेळनुसार गोचर होत असतात. त्यामुळे काही योग निर्माण होतात. आता शनी गोचरमुळे केंद्र त्रिकोण राजयोग होत आहे. याचा काही काहींवर परिणाम होणार आहे. तर काही राशींचे भाग्य उजळणार आहे.

Updated: May 10, 2023, 03:44 PM IST
Shani Trikon Rajyog : मोठा योग, 30 दिवसांनंतर शनी 'या' राशींचे भाग्य उजळणार

Shani Vakri Effect 2023 : शनी वक्री होत असल्याने  केंद्र त्रिकोण राजयोग होत आहे. प्रत्येक ग्रह आपापल्या वेळेवर संक्रमण करतो. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. 17 जून रोजी कुंभ राशीत शनी गोचर होणार आहे. त्याचबरोबर केंद्र त्रिकोण राजयोगही होत आहे. त्यामुळे याचा काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळेणार आहे. काहींना नोकरीत बढती मिळणार आहे. तसेच जुन्या आजारांपासून सुटका मिळू शकते.

शनीला एका ग्रहावरुन दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी अडीच वर्षे लागतात. यावर्षी 17 जानेवारीला शनीचे स्वतःच्या राशीत गोचर झाले आहे आणि 17 जूनला कुंभ राशीत गोचर होणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत शनी याच अवस्थेत राहणार आहे. या दरम्यान शनीच्या गोचरमुळे मध्य त्रिकोण राजयोग तयार होत आहे.ज्योतिष शास्त्रात हा भाग्यशाली राजयोग मानला जातो. जेव्हा कुंडलीत 3, 4, 7, 10 आणि 1, 5, 9 सारखे त्रिकोण जोडले जातात तेव्हा केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतो. ज्यामध्ये माता लक्ष्मी ही त्रिकोणाची देवी म्हणून ओळखली जाते आणि भगवान विष्णूही मध्यवर्ती देवता आहे. मध्य त्रिकोण राजयोगाने व्यक्तीचे भाग्य उजळते, असे मानले जाते. तसेच याचा काही राशींना लाभ होणार आहे. त्यामुळे त्यांचे भाग्य उजळणार आहे. या काळात सरकारी लाभ आणि नोकरीत उच्च पद मिळू शकते.

या राशीच्या लोकांवर शनीची राहणार कृपा

वृषभ

त्रिकोण राजयोगामुळे वृषभ राशींच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीत शनी गोचर होत असल्याने या राशींच्या लोकांच्या नोकरीत सकारात्मक बदल घडवून दिसून येील. या दरम्यान तुम्हाला नोकरीचे चांगले पर्याय मिळतील. या काळात या लोकांना सुख, समृद्धी आणि आनंदी जीवन जगायला मिळेल. यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी उत्तम राहील. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल.

मिथुन

या राशीच्या राशीच्या लोकांसाठी कुंभ राशीतील शनीचीचे गोरच खूप काही सांगून जात आहे. तुमच्या कुंडलीच्या नवव्या घरात केंद्र त्रिकोण राजयोग तयार होईल. या दरम्यान व्यक्तीला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या संशोधन कार्यात सहभागी असाल तर हा कालावधी तुम्हाला चांगला परिणाम देईल. दुसरीकडे, जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. इच्छित नोकरी मिळण्याची सर्व शक्यता आहे.

सिंह 

तुमच्या कुंडलीतील सहाव्या घरात शनीचे राज्य आहे. या दरम्यान तुम्हाला पैशांची बचत करण्यात यश मिळेल. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी गोचर होणारा शनी खूप फायदेशीर ठरेल. नियमित प्रयत्नात यश मिळेल. एखाद्या व्यक्तीला जुन्या आजारांपासून सुटका मिळू शकते. नोकरदारांसाठी चांगली बातमी आहे. त्यांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)