Shani Jayanti 2023 : सूर्यग्रहणासोबत (#SolarEclipse2023) आज शनि जयंती आहे. शनिचं नाव घेतलं तरी भल्या भल्या लोकांना घाम फुटतो. कारण ज्या कुंडलीती शनिदोष असेल, शनिची साडेसाती असेल त्याला आर्थिक संकटापासून अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. शनि हा नऊ ग्रहामधील सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. कारण शनिदेवाला देवाने आपल्या कर्माची फळ देण्याचं काम दिलं आहे. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न राहतो. जर तुम्ही कुठले वाईट कर्म केलं असेल तर तो त्याची आपल्याला शिक्षा देतो.
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक सुखाचा कारक आहे. त्यामुळे आज शनि जयंतीनिमित्त शनिदेवाची उपासना करु हे कुंडलीतील दोष नाहीसे करु शकता. शनि जयंती ही वर्षातून दोन वेळा येते. एक वैशाख आणि दुसरी ज्येष्ठ महिन्यात येते. वैशाख शनि जयंतीचा शुभ मुहूर्त आणि उपाय याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
पंचांगानुसार, वैशाख अमावस्या (Vaishakh Shani Jayanti 2023) तिथी 19 एप्रिल 2023 ला सकाळी 11.23 वाजता सुरू झाली आहे. आज 20 एप्रिल 2023 ला सकाळी 09.41 वाजेपर्यंत असणार आहे. यावर्षी वैशाख अमावस्येलाही सूर्यग्रहणदेखील (Surya Grahan 2023) आहे. पण हे ग्रहण (Surya Grahan 2023 Date) भारतात दिसणार नसल्याने सुतक लागणार नाही.
सकाळची वेळ - 05.51 वाजेपासून - 07.28 वाजेपर्यंत (19 मे 2023)
दुपारचा मुहूर्त - 10.43 वाजेपासून - 01.58 वाजेपर्यंत (19 मे 2023)
संध्याकाळची वेळ - 06.50 वाजेपासून - 08.12 वाजेपर्यंत (19 मे 2023)
वैशाख अमावस्येला ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळ करा. त्यानंतर पूजेची तयारी करा.
मंदिरात जाऊन शनिदेवांच्या मूर्तीवर तेल, फुलं आणि प्रसाद अर्पण करा.
उडदाची डाळ आणि काळे तीळ शनिदेवांना अर्पण करा.
मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनि चालिसेचं पठण करुन आरती करा.
गरीबांना दान करा.
शनिदेव हे सूर्यदेव आणि छायादेवी यांचं पुत्र असून यम आणि यमुना त्यांचे भाऊ बहीण आहेत. शनि जयंतीला विधीवत पूजा करू न साडेसाती, अडीचकी आणि महादशेच्या अशुभ कमी करता येतो. त्यामुळे शनि जयंतीला विधीवत पूजा करणे शुभ मानले जाते.
या दिवशी मंत्रोच्चार, गरजूंना दान, असहाय्य व्यक्तीला मदत केल्याने शनिदेवाच्या साडेसातीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते, शास्त्रात सांगण्यात आलं आहे. शनि जयंतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला अन्नदान केल्याने खूप शुभ फळ मिळते.