Todays Panchang : आज सूर्यग्रहण, अमावस्या आणि शनि जयंती! जाणून घ्या आजचं पंचांगानुसार मुहूर्त आणि राहुकाल

Todays Panchang :  सूर्यग्रहण, वैशाख अमावस्या आणि शनि जयंती...तर चंद्र आज मेष राशीत प्रवेश करणार आहे. चला मग जाणून घ्या गुरुवाचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल 

नेहा चौधरी | Updated: Apr 20, 2023, 06:07 AM IST
Todays Panchang : आज सूर्यग्रहण, अमावस्या आणि शनि जयंती! जाणून घ्या आजचं पंचांगानुसार मुहूर्त आणि राहुकाल  title=
todays panchang 20 april 2023 tithi shubh mahurat rahu kaal Surya Grahan 2023 Shani Jayanti 2023 Vaishakh Amavasya 2023 and Chandra Gochar

Todays Panchang 20 April 2023 in marathi : आज गुरुवार... 20 एप्रिल 2023...आजच्या दिवशी अनेक घडामोडी आहे. ग्रहणाचं नाव घेतलं तरी आपल्याला भीती वाटते. आज वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. शिवाय वैशाख अमवास्या (Vaishakh Amavasya 2023), सूर्यग्रहण आणि शनि जयंतीदेखील (Shani Jayanti 2023) आहे. अमवास्या, सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2023) शुभ कार्य करायची नसतात, असं वैदिक शास्त्रात सांगण्यात आलं आहे.  

तर चंद्र (Chandra Gochar) मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घेऊया गुरुवारचं पंचांगानुसार बनलेले शुभ मुहूर्त आणि योग किती काळ किती आहे ते...(todays panchang 20 april 2023 tithi shubh mahurat rahu kaal Surya Grahan 2023 Shani Jayanti 2023 Vaishakh Amavasya 2023 and Chandra Gochar) 

आजचं पंचांग खास मराठीत ! (todays panchang 20 april 2023 in marathi)

आजचा वार - गुरुवार 

तिथी - अमावस्या - 09:44:13 पर्यंत

नक्षत्र - अश्विनी - 23:11:07 पर्यंत

करण - नागा - 09:44:13 पर्यंत, किन्स्तुघ्ना - 21:03:38 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - विश्कुम्भ - 12:59:40 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:18:02 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06:57:14 वाजता

चंद्रोदय - चंद्रोदय नाही

चंद्रास्त - 19:15:00

चंद्र रास - मेष

ऋतू - वसंत

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त – 10:31:07 पासून 11:21:43 पर्यंत, 15:34:47 पासून 16:25:24 पर्यंत

कुलिक – 10:31:07 पासून 11:21:43 पर्यंत

कंटक – 15:34:47 पासून 16:25:24 पर्यंत

राहु काळ – 14:12:33 पासून 15:47:27 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम – 17:16:01 पासून 18:06:38 पर्यंत

यमघण्ट – 07:08:39 पासून 07:59:16 पर्यंत

यमगण्ड – 06:18:02 पासून 07:52:57 पर्यंत

गुलिक काळ – 09:27:51 पासून 11:02:45 पर्यंत

आजचे शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त  - 12:12:20 पासून 13:02:57 पर्यंत

दिशा शूळ - दक्षिण

आजचा मंत्र

ओम ग्रं हरित ग्रां सह गुरुवे नमः। 
ॐ बृहस्पतये नमः ।

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल 

मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)