Grah Gochar in October 2022: नवग्रहांच्या गोचराचा 12 राशींवर शुभ अशुभ परिणाम होत असतो. ग्रह त्यांच्या गोचर कालावधीनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ग्रहांच्या प्रभावानुसार त्या त्या राशींना फळं मिळत असतात. ग्रहांचा प्रभाव काही दिवसांसाठी असतो. त्यानंतर ग्रह पुढच्या राशीत मार्गस्थ होतात आणि त्या त्या स्थानानुसार शुभ-अशुभ फळं देतात. 23 ऑक्टोबरला शनिदेव मकर राशीतून (Shani Gochar) मार्गस्थ होत आहेत. दुसरीकडे मंगळ 16 ऑक्टोबरला (Mangal Gochar) मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या दोन प्रमुख ग्रहांच्या गोचरामुळे ऑक्टोबरमध्ये (Grah Gochar October) मोठी उलथापालथ होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना सकारात्मक प्रभाव जाणवेल जाणून घ्या..
कर्क: मंगळ ग्रहाच्या राशी बदलमुळे नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही नवीन व्यवसायही सुरू करू शकता. तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होण्याचीही शक्यता आहे.
तूळ: दोन्ही ग्रहांच्या गोचर काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तुमच्या उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील. कुटुंबात शांतता राहील आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुमचे जीवन शांततेत जाईल आणि मुलांच्या शिक्षणात प्रगती दिसेल.
मिथुन: ऑक्टोबर महिना देखील मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना पुढील महिन्यात ऑफर मिळू शकतात. या महिन्यात कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता.
वृश्चिक: शनि ग्रहाच्या गोचरामुळे जीवनातील ताण दूर होऊ शकतो. या संक्रमण कालावधीत तुम्ही गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम मिळतील. जुनाट आजारांपासून मुक्ती मिळू शकते. पूर्वीपासून सुरू असलेली न्यायालयीन प्रकरणे सुटू शकतात. व्यवसायात अनेक मोठे करार निश्चित होऊ शकतात.
मीन: शनिच्या राशी बदलामुळे या राशीच्या लोकांना कुटुंबासह बाहेर फिरण्याची संधी मिळेल. तुमच्या कामांमुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. घरातील त्रासांपासून मुक्ती मिळेल आणि आरोग्य चांगले राहील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आपल्या बोलण्यावर संयम ठेवा आणि विनाकारण रागावणे टाळा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)