Totke: घरात उपलब्ध असलेलं लवंग इतकं प्रभावी, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रातील तोडगे

Vastu Tips: ज्योतिषशास्त्र, सामुद्रीकशास्त्र आणि वास्तुशास्त्र या माध्यमातून अडचणी सोडवण्यासोबत चांगल्या भविष्यासाठी वाट मोकळी केली जाते. कुंडलीत ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा शुभ-अशुभ परिणाम जातकांवर होत असतो. ग्रहांची स्थिती आणि कर्मावरून माणसाला चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात. यासाठी ज्योतिषशास्त्र आणि लाल किताबात काही उपाय देण्यात आले आहेत.

Updated: Dec 27, 2022, 04:33 PM IST
Totke: घरात उपलब्ध असलेलं लवंग इतकं प्रभावी, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रातील तोडगे title=

Vastu Tips: ज्योतिषशास्त्र, सामुद्रीकशास्त्र आणि वास्तुशास्त्र या माध्यमातून अडचणी सोडवण्यासोबत चांगल्या भविष्यासाठी वाट मोकळी केली जाते. कुंडलीत ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा शुभ-अशुभ परिणाम जातकांवर होत असतो. ग्रहांची स्थिती आणि कर्मावरून माणसाला चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात. यासाठी ज्योतिषशास्त्र आणि लाल किताबात काही उपाय देण्यात आले आहेत. या तोडग्यांमुळे जातकाला अडचणीच्या काळात दिलासा मिळतो.  आर्थिक अडचण, संकट, अडकलेली कामं मार्गी लागतात. तोडग्यामुळे नशिबाची साथही मिळते. लवंगाचे काही तोडगे वापरून आपण यावर मात करू शकतो. लवंग प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाकघरात असते. हा एक प्रकारचा मसाला आहे. लवंगाचे आरोग्यवर्धक फायदे आहेत. यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, ओमेगा 3 फॅटी अॅसिड असे गुणधर्म असतात. आयुर्वेदानुसार लवंगाचे सेवन करून आरोग्याशी निगडीत फायदे मिळू शकतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी अशाच काही उपायांबाबत आज जाणून घेणार आहोत.

लवंगाचे चमत्कारी तोडगे

  • ज्या जातकांच्या कुंडलीत राहु आणि केतुची स्थिती अशुभ असते. अशा लोकांनाी हा दोष दूर करण्यासाठी शनिवारी लवंगाचं दान करावं. यामुळे राहु-केतुच्या दोषातून दिलासा मिळतो.
  • प्रत्येक शनिवारी शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने राहु-केतुच्या दोषातून दिलासा मिळतो. हा उपाय सलग 40 दिवस करावा. यामुळे अडचणी दूर होतात आणि जीवनात आनंद मिळतो. 
  • कामामध्ये वारंवार अडचणी येत असतील तर तोंडात लवंग ठेवून घरातून निघावं. तसेच कामाच्या ठिकाणी जाऊन ईष्टदेवतेची यशासाठी प्रार्थना करावी. 

बातमी वाचा- सावन का महिना...! येत्या वर्षात श्रावण महिना लांबणार, इतके दिवस खावं लागणार व्हेज

  • प्रयत्न करूनही कामात यश मिळत नसेल तर मंगळवारी मारुतीच्या मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच दिव्यात काही काही लवंग टाकावेत. हनुमान चालीसेचं पठण करून आरती करावी. 21 मंगळवार हा उपाय करावा.
  • आर्थिक अडचण असेल आणि पैसे अडकले असतील तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी. पूजा करताना 5 लवंग, 5 कवड्या ठेवा. पुढच्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा मिळते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)