Jyeshth Amavasya 2022: 28 की 29 जून कधी आहे ज्येष्ठ महिन्याची अमावस्या? जाणून घ्या पूजेची पद्धत

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शेतकरी त्यांच्या कृषी अवजारांची पूजा करतात. तसेच पिकांच्या पेरणीला सुरुवात करतात.

Updated: Jun 27, 2022, 12:45 PM IST
Jyeshth Amavasya 2022: 28 की 29 जून कधी आहे ज्येष्ठ महिन्याची अमावस्या? जाणून घ्या पूजेची पद्धत title=

Amavasya Puja Vidhi And Upay: ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शेतकरी त्यांच्या कृषी अवजारांची पूजा करतात. तसेच पिकांच्या पेरणीला सुरुवात करतात. यंदा ज्येष्ठ अमावस्या 28 जून की 29 जून याबाबत शंका आहे. हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या  28 जून मंगळवारी येत आहे. पण स्नान आणि दानाची अमावास्या 29 जून, बुधवारी असेल. ज्येष्ठ अमावस्या दिनांक 28 जून 2022 रोजी सकाळी 05:52 पासून सुरू होऊन 29 जून 2022 रोजी सकाळी 08:21 पर्यंत राहील.

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी हे उपाय करा

- ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे. हे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करावे.

- स्नानानंतर सूर्याला पाणी अर्पण करावे. या दिवशी उपवास करणे फलदायी असते.

- अमावास्येला दान करावे. यामुळे पितरही प्रसन्न राहतात आणि जीवनात सुख-समृद्धीही येते.

- पैशांची अडचण असल्यास ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळ करून पिठाचे गोळे बनवून माशांना खाऊ घालावेत. यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. शक्य असल्यास प्रत्येक अमावास्येला हा उपाय करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)