Holi Chandra Grahan 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांना फार महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीनुसार मानवी जीनव आणि पृथ्वीवर चांगला आणि वाईट परिणाम होत असतो. जेव्हा जेव्हा ग्रह आणि नक्षत्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्याचा परिणाम मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम पाहिला मिळतो. यंदा होळीच्या दिवशी या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे. हिंदू पंचांगानुसार होळी 14 मार्च 2025 ला साजरी करण्यात येणार आहे. होळीच्या दिवशी या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 14 मार्चला सकाळी 9:29 वाजता लागणार असून दुपारी 3:29 वाजेपर्यंत असणार आहे. महत्त्वाच म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे याचा सुतक काळ वैध नसणार आहे. पण या चंद्रग्रहणाचा परिणाम 12 राशींवर होणार आहे. यातील काही राशीच्या लोकांना वाईट काळाचा सामना करावा लागणार आहे. चला तर वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणादरम्यान कोणत्या राशींसाठी धोकादायक आहे, पाहूयात.
या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत, सुविधांमध्ये झपाट्याने घट पाहिला मिळणार आहे. घरात एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला मानसिक ताण येण्याची शक्यता आहे. यासोबतच, कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करणे तुमच्या हिताचे ठरले. तुम्ही कायदेशीर अडचणीत येणार आहात. यासोबतच, हे ग्रहण चौथ्या घरात असल्यामुळे तुम्हाला काही प्रकारच्या तणावाचा सामना करावा लागणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा. यामुळे तुमचे खूप नुकसान होण्याची भीती आहे.
या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण फारसे चांगले नसणार आहे. या राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासोबतच, आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने तणाव असणार आहे. अशा परिस्थितीत, अध्यात्माकडे वळून तुम्ही चांगले परिणाम मिळणार आहे. तुमच्या कारकिर्दीतही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तुम्ही तुमच्या भविष्याबाबत चिंतेत असणार आहे.
या राशीच्या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. एखाद्या छोट्या कामात तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. पण असे असूनही तुम्हाला यश मिळणार नाही. अनावश्यक खर्चामुळे तुम्ही त्रस्त असणार आहे. हे ग्रहण बाराव्या घरात असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचा अभाव दिसून येणार आहे. एकाग्रतेचा अभाव जाणवणार आहे. तुमच्या आरोग्याबद्दल थोडे सावध राहा. यामुळे तुमचे खूप नुकसान होण्याची भीती आहे. तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल थोडी काळजी वाटणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)