Jupiter Retrograde in Aries : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थिती बदलाला अतिशय महत्त्व आहे. ग्रह किंवा नक्षत्र जेव्हा आपलं स्थान बदलतं तेव्हा याचा परिणाम 12 राशींच्या आयुष्यावर दिसून येतो. ग्रहांचं हे गोचर काही राशींसाठी सकारात्मक ठरतं तर काही राशींच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम दिसून येतो. बृहस्पति म्हणजे गुरु मेष राशीत संक्रमण झाले आहेत. आता तो प्रतिगामी होणार आहे. त्यामुळे गुरु वक्रीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. (Guru Vakri 2023 jupiter retrograde in aries after 21 years these zodiac will get moeny according astrology)
गुरु वक्रीमुळे कर्क राशीच्या लोकांना अतिशय लाभ होणार आहे. गुरु हा कर्क राशीच्या सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमची चांगली प्रगती होणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे.
गुरु वक्रीमुळे या राशीच्या लोकांना शुभदायक ठरणार आहे. सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक वेळी नशिब उत्तम साथ मिळणार आहे. या राशीच्या पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी हा गुरुदेव आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद मिळणार आहे. संशोधनाशी संबंधित लोकांना या स्थितीचा फायदा होणार आहे. रखडलेली काम पूर्ण होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. उत्पन्नात घसघशीत वाढ होणार आहे.
या राशीच्या लोकांना गुरु वक्रीमुळे उत्तम दिवस सुरु होणार आहे. धनु राशीच्या पाचव्या घरात गुरु पूर्वगामी होणार असल्याने या लोकांना लव्ह लाइफमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग जुळून आला आहे. धर्म आणि अध्यात्म क्षेत्रात फायदा होणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी गुरु असल्याने तुमच्यासाठी ही स्थिती अतिशय शुभदायक ठरणार आहे. प्रत्येक काम सहज मार्गी लागणार आहे.