Guru Chandal Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी गोचर करतात. यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. अशा स्थितीत अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग तयार होताना. असाच मेष राशीत राहू आणि गुरूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ योग तयार झाला. 22 एप्रिलपासून मेष राशीत गुरु चांडाळ योग सुरू आहे.
या योगाच्या निर्मितीमुळे अनेक राशीच्या लोकांना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागलं आहे. मात्र आता गुरु चांडाल योग 30 ऑक्टोबर 2023 पासून समाप्त होणार आहे. जाणून घेऊया हा योग संपल्यानंतर कोणत्या राशींच्या आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार, 30 ऑक्टोबर रोजी मायावी ग्रह राहू आपली राशी बदलणार आहे. यावेळी राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत 30 ऑक्टोबरपासून मेष राशीत गुरु चांडाल योग संपणार आहे. .
या राशीतच गुरु चांडाळ योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत 30 ऑक्टोबरपासून या राशींचं भाग्य बदलणार आहे. या काळात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. गुरु चांडाळ योग दूर केल्याने गुरूंचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहेत. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
राहु मीन राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांवर गुरु चांडाल योगाचा अशुभ प्रभाव नाहीसा होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. सुख-समृद्धीसोबतच संपत्तीही वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती पुन्हा मजबूत होईल. तुम्हाला प्रमोशनसोबत काही मोठी जबाबदारी मिळू शकते.
गुरु चांडाल योग 30 ऑक्टोबरला संपत असल्याने या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. अशा परिस्थितीत आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. वैवाहिक जीवनातील समस्याही संपतील. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होईल. न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)