Horoscope 10 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी एखादा मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. तुमच्या मनात खूप काही आहे पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. देवाच्या दर्शनासाठी तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत तीर्थयात्रेला जाऊ शकता.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत काही तणावपूर्ण गोष्टी घडू शकतात. व्यावसायिकांना आज पैशांचा तुटवडा जाणवू शकतो.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे कामात अडचणी येऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांनी काही काळ निर्णय पुढे ढकलावा.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. अनावश्यक वादविवादांपासून दूर राहा
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. जोडीदारासोबत काही नाराजी सुरू असेल तर तीही आज दूर होईल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्हाला कोणत्याही कामात मदत करायची असेल तर ती मनापासून करा.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी लोकांसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. तुमचे निर्णय सार्थ ठरतील. इतरांचा विश्वास जिंकाल.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. अचानक धनलाभ झाल्याने मोठा फायदा होईल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी ऑफिसमध्ये कामाची तपासणी होऊ शकते. कुटुंबियांच्या सहकार्यामुळे काही कामे मार्गी लागतील.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. नवीन प्रेमसंबंधांना सुरुवात होऊ शकते. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी एखाद्या कामात पुढाकार घेतल्यास फायदा होईल. जमीनजुमल्याचे व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )