Mercury Transit 2023: 16 मार्च पासून गुरूच्या मीन राशीमध्ये बुधाचं परिवर्तन होणार आहे. यावेळी बुध सूर्याशी संयोग होऊन बुधादित्य योग तयार होणार आहे. त्याचप्रमाणे गुरू देखील आपल्या मीन राशीत आहे. 16 मार्च म्हणजेच गुरुवार बुध ग्रह सकाळी 10.54 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान बुधादित्य योग आहे जो अनेक राशींसाठी शुभ राहणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या.
मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे बुधाचं होणारं परिवर्तन काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. काही राशीच्या व्यक्तींना नोकरीत लाभासोबतच प्रगती होण्याची शक्यता आहे. तर काही राशींची चांगला पैसा मिळण्याचे योग आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाला राजकुमाराचा दर्जा असून बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. बुध हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. मुळात जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.
या राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचं संक्रमण लाभदायक ठरणार आहे. या व्यक्तींना नोकरीत लाभ मिळाणार असून पैसा मिळण्याचे योग आहेत. याचसोबत मिथुन राशीच्या लोकांसाठी हे परिवर्तन बिझनेसमध्ये नवीन संधी घेऊन येणार असल्याचं मानलं जातंय.
बुधाचं होणारं परिवर्तन या राशीच्या व्यक्तींना चांगलं फळ देणार आहे. यावेळी जोडीदाराशी संबंध सुधारणार असून आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणचा ताण कमी होऊ शकतो. नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता. तुमच्या जीवनातील आरामदायी गोष्टी वाढणार आहेत.
बुध ग्रहाच्या शुभ प्रभावाने वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे. आर्थिक गोष्टींच्या बाबतीत तसंच व्यवसायात लाभ मिळू शकतो. याशिवाय या राशीच्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल काळ मानला जातोय.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुधादित्य योग तुमच्या जीवनातील अशुभ प्रभाव कमी करण्यास मगत करणार आहे. बुधाच्या या परिवर्तनाने आयुष्यात प्रेम अनुकूलता आणेल. स्पर्धांमध्ये यश मिळणार आहे.