Shash Mahapurush Rajyog: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे काही खास राजयोग तयार होतात. यावेळी न्यायाची देवता आणि परिणाम देणारा शनिदेव यांनी राशीबदल केल्यानंतर सर्व राशींच्या जीवनावर नक्कीच होतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. यावेळी शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत स्थित आहे. स्वतःच्या राशीत स्थित असल्यामुळे शश नावाचा राजयोग तयार होणार आहे. हा दुर्मिळ राजयोग पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि स्वतःच्या राशीत मकर किंवा कुंभ राशीत असतो किंवा त्याच्या उच्च राशीतून जात असताना कुंडलीच्या मध्यभागी स्थित असतो. नेमका त्याचवेळी हा योग तयार होतो. या राजयोगाचे परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येणार आहेत. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
कुंभ राशीच्या चढत्या घरात शश राजयोग तयार होणार असून या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यशासोबतच भरपूर आर्थिक लाभही मिळतील. तुम्हाला मानसिक आणि शारीरिक तणावापासून आराम मिळणार आहे. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळेल. अनावश्यक खर्चातून सुटका मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होणार आहेत.
शश राजयोगाचा वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनावरही सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असू शकते. या राशीच्या लोकांना स्थावर मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांनाही बरेच फायदे मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अनेक संधी मिळू शकतात. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते.
या राजयोगाच्या निर्मितीमुळे मकर राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. गुरु नक्षत्रात असल्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या काळात तुम्हाला दीर्घकाळ चालणाऱ्या आजारापासून आराम मिळू शकणार आहे. कोर्टातील अडचणींपासून दिलासा मिळू शकेल. जमीन, प्लांट इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )