Shani Gochar: 30 वर्षानंतर शनी मूळ त्रिकोण राशीत विराजमान; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Saturn Transit Aquarius 2024: आता तब्बल 30 वर्षांनंतर, शनी देव त्यांची मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये स्थित आहे. 2025 पर्यंत या राशीत राहतील. या वर्षी शनी फक्त कुंभ राशीत राहणार आहेत.

Updated: Jan 13, 2024, 07:40 AM IST
Shani Gochar: 30 वर्षानंतर शनी मूळ त्रिकोण राशीत विराजमान; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार title=

Saturn Transit Aquarius 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये कर्म दाता शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. याशिवाय शनी देव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. 

आता तब्बल 30 वर्षांनंतर, शनी देव त्यांची मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये स्थित आहे. 2025 पर्यंत या राशीत राहतील. या वर्षी शनी फक्त कुंभ राशीत राहणार आहेत. पण यावेळी परिस्थितीत थोडा बदल होणार आहे. शनीच्या स्थितीत बदल झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना प्रचंड लाभासोबत सुख-समृद्धी मिळू शकणार आहे. जाणून घेऊया शनीच्या गोचरमुळे कोणच्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.

मेष रास (Mesh Zodiac)

मेष राशीच्या लोकांना शनि अस्तापासून विशेष लाभ मिळणार आहे. मेष राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असेल. पगारवाढीसोबत प्रमोशन मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मानसिक तणावाचा सामना करावा लागत असेल तर आता तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो. परदेशात नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आरोग्यही चांगले राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात. 

कन्या रास (Kanya Zodiac)

या राशीमध्ये, शनि पाचव्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अपार यशासोबतच आर्थिक लाभही मिळू शकणार आहे. तुम्ही कधीही तुमच्या नशिबावर अवलंबून राहू नका. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही तसे करू शकता. या काळात त्यांच्या आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे.

वृश्चिक रास (Vraschik Zodiac)

या राशीमध्ये शनी पाचव्या भावात स्थित आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील. आर्थिक लाभ होण्यास थोडा विलंब होऊ शकतो. नोकरी बदलण्याचीही शक्यता आहे. पगार वाढल्याने तुम्ही एखादा मोठा प्रकल्प साध्य करू शकता. कौटुंबिक वातावरण आनंदी राहणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )