फक्त 20 हजारांत घरबसल्या सुरू करा 'हा' बिझनेस, दर महिन्याला कमवाल भरपूर पैसे

Low Investment Business Idea: आजकाल प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बिझनेसच्या कल्पना देणार आहोत.

Dec 01, 2023, 13:44 PM IST
1/7

आम्ही सांगणाऱ्या व्यवसायातून तुम्ही घरी बसून खूप चांगला नफा कमवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज भासणार नाही, तर तुम्ही केवळ टाकाऊ वस्तूंद्वारेच सुरुवात करू शकता.   

2/7

हा व्यवसाय इतका साधा आणि सोपा आहे की तुम्ही त्याची सुरुवात घरगुती रद्दीपासून करू शकता. 

3/7

दरवर्षी जगभरात दोन अब्ज टनांहून अधिक कचरा निर्माण होतो. भारतात देखील 277 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. अनेक वेळा लोक टाकाऊ वस्तूंपासून घराच्या सजावटीच्या वस्तू, पेंटिंग्ज, दागिने इत्यादी बनवून त्याचं व्यवसायात रूपांतर करतात. 

4/7

या व्यवसायातून लोक लाखोंचा नफा कमावत आहेत. अशा परिस्थितीत ही तुमच्यासाठी चांगली कल्पना असू शकते.

5/7

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या आणि घरातून टाकाऊ वस्तू गोळा कराव्या लागतील. त्यानंतर सर्व वेगवेगळ्या वस्तूंचे डिझायनिंग आणि कलरिंग करा.

6/7

किटली, काच, कंगवा, लाकडी कलाकुसरीसह घरातील सजावटीच्या वस्तूही टाकाऊ वस्तूंपासून बनवल्या जातात. जेव्हा माल तयार होतो, तेव्हा मार्केटिंगचे काम सुरू होते आणि यासाठी लोक अॅमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांची मदत घेऊ शकतात. 

7/7

टाकाऊ वस्तूंपासून व्यवसाय सुरू करण्यापूर्वी लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, त्यातून किती नफा कमावता येईल. तर, 'द कबाडी डॉट कॉम' स्टार्टअपचा संस्थापक शुभम सांगतो की, सुरुवातीला त्याने एक ऑटो, एक रिक्षा आणि तीन लोकांसोबत घरोघरी कचरा गोळा करायला सुरुवात केली आणि आता त्याची मासिक उलाढाल 10 लाख रुपये आहे.