Himachal Snowfall Photos: मनाली, स्पिती व्हॅली बर्फात हरवली; अती बर्फवृष्टीमुळं रोहतांग पास बंद

Himachal Pradesh Snowfall : लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून या हिमाचलमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येनं प्रवासी येत असता. पण, इथला हिवाळा काही औरच.   

Dec 01, 2023, 11:51 AM IST

Himachal Pradesh Snowfall : हिवाळा म्हटलं की, देशातील काही राज्यांच्या नावं आवर्जून घेतली जातात. यातलंच एक नाव म्हणजे हिमाचल प्रदेश. 

1/7

रक्त गोठवणारी थंडी

Himachal Pradesh Weather Manali Lahaul Spiti snowfall Photos

Himachal Pradesh Snowfall : तुम्ही आता तिथं जाण्याचा बेत आखत असाल तर, रक्त गोठवणाऱ्या थंडीसाठी तयार राहा. 

2/7

सुखद बदल

Himachal Pradesh Weather Manali Lahaul Spiti snowfall Photos

देशातील हवामानात आता सुखद बदल होण्यास सुरुवात झाली असून, त्याची प्रचिती उत्तरेकडील राज्यांमध्ये येत आहे. कारण, तिथं कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. 

3/7

लाहौल, स्पिती

Himachal Pradesh Weather Manali Lahaul Spiti snowfall Photos

हिमाचल प्रदेशातील लाहौल, स्पिती, किन्नौर आणि पांगी अशा उंचावरील ठिकाणांवर बर्फवृष्टीमुळं सर्वत्र बर्फाचीच चादर पाहायला मिळत आहे. 

4/7

बर्फवृष्टी सुरुच

Himachal Pradesh Weather Manali Lahaul Spiti snowfall Photos

लाहौल स्पितीमधील कोकसर येथे प्रचंड बर्फवृष्टी झाली असून, मनालीमध्येही गुरुवारी बर्फवृष्टीमुळं पर्यटकांचा उत्साह द्विगुणित झाला. भुरभुरणाऱ्या बर्फाचं प्रमाण जास्त असल्यामुळं अटल टनलही बंद करण्यात आला. 

5/7

हवामान विभागाचा इशारा

Himachal Pradesh Weather Manali Lahaul Spiti snowfall Photos

पोलीस आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणांसह हवामान विभागानंही इथं हिमवृष्टीच्या अंदाजानुसार तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय या वातावरणात नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

6/7

रोहतांग पासही बंद

Himachal Pradesh Weather Manali Lahaul Spiti snowfall Photos

पुढील 24 तासांमध्येही हिमाचल, स्पितीचं खोलं, पिन व्हॅली आणि चंद्रताल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बर्फवृष्टीचं प्रमाण पाहता रोहतांग पास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळं आता स्पितीहून मनाली गाठणाऱ्यांना वळसा मारून लांबचा प्रवास करावा लागत आहे. 

7/7

पर्यटकांची संख्या वाढणार

Himachal Pradesh Weather Manali Lahaul Spiti snowfall Photos

मनालीमध्ये सध्या वातावरणात झालेले बदल पाहता इथं दिल्लीसह देशविदेशातील पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ज्यासाठी सध्या प्रशासन सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे.