'मी जर तुझ्या कुटुंबाला....', चाहत्याने दुसऱ्या बायकोचा अपमान केल्याने संतापला Youtuber अरमान मलिक

डिनरनंतर एका चाहत्याने कृतिकाकडे फोटोसाठी विनंती केली. कृतिका फोटो क्लिक करत असताना चाहत्याने तिला बाजूला होण्यास सांगितलं.   

Shivraj Yadav | Feb 07, 2025, 21:15 PM IST

डिनरनंतर एका चाहत्याने कृतिकाकडे फोटोसाठी विनंती केली. कृतिका फोटो क्लिक करत असताना चाहत्याने तिला बाजूला होण्यास सांगितलं. 

1/7

युट्यूबर अरमान मलिकच्या दोन पत्नी आहेत. अरमान मलिक अनेकदा दोघींसह सार्वजनिक ठिकाणी दिसतो. यावेळी अरमान आपल्या दुसऱ्या पत्नीसह डिनरसाठी बाहेर पडला होता.   

2/7

डिनरनंतर एका चाहत्याने कृतिकाकडे फोटोसाठी विनंती केली. कृतिका फोटो क्लिक करत असताना चाहत्याने तिला बाजूला होण्यास सांगितलं.   

3/7

हे सगळं पाहिल्यानंतर अरमान संतापला.   

4/7

अरमान म्हणाला, 'एक व्यक्ती शिस्तीत फोटो क्लिक करुन घेतोय आणि तुम्ही उपकार केल्यासारखं दाखवत आहात'.  

5/7

"मी तुझ्या कुटुंबातील एखाद्याला असं बोललं तर कसं वाटेल. हिला काय हौस आहे का तुम्हाला लोकांसोबत फोटो काढायची?".  

6/7

पण चाहते अरमान आणि कृतिकालाच ट्रोल करत आहेत. नेहमी कृतिकासोबतच असं का होतं? अशी विचारणा ते करत आहेत.   

7/7

अरमान मलिक आपल्या दोन्ही पत्नींसह रिअॅलिटी शो 'बिग बॉस' ओटीटीमध्ये दिसला होता. दुसरी पत्नी कृतिका फायनलपर्यंत गेली होती.